Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सूरज साखरेवरील गोळीबार प्रकरणी दोन आरोपींना अटकपृथ्वी अजित मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिरकृषी पदव्युत्तर प्रवेश परीक्षेत डीवाय पाटील कृषीचे विद्यार्थी राज्यात प्रथमदक्षिण भारत जैन सभेचे १०४ वे नैमित्तिक अधिवेशन २ ऑगस्टला कोल्हापुरातज्येष्ठ विधीज्ञ ॲड. नीला सोनटक्के यांचे निधनशक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शनिवारी पंढरपूरमध्ये सद्बुद्धी दिंडी यात्रा , बाधित शेतकऱ्यांची होणार सभा हॉटेल मालक संघाच्या अध्यक्षपदी सचिन शानभाग, उपाध्यक्षपदी अरुण भोसलेसर्किट बेंचच्या अंतर्गत तक्रार समितीची स्थापना ! अध्यक्षपदी न्यायमूर्ती वृषाली जोशी, समिती सदस्यपदी आठ जण ! !शिरोलीत पोलिसांची कारवाई, ग्रामपंचायत सदस्यासह सहा जण वर्षभरासाठी हद्दपार महापालिका स्तरावरील सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूलचे वर्चस्व

जाहिरात

 

पृथ्वी अजित मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

schedule17 Jul 26 person by visibility 60 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासन अधिकारी पृथ्वी अजित मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (18 जुलै 2026) आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे. गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज येथील शिक्षण महर्षी प्राचार्य एम आर देसाई ग्रंथालय सभागृहामध्ये सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे.  या अंतर्गत रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. तसेच बीपी, शुगर, अस्थमा, दातांची तपासणी व डोळे तपासणी मोफत करण्यात येणार आहे. इको इसीजी तपासणी सवलतीत केले जाणार आहे. या आरोग्य तपासणी शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे. दरम्यान मोफत आरोग्य तपासणी निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात सहभागी रक्तदात्यांचा विमा उतरविण्यात येणार आहे. तसेच त्यांना आकर्षक भेट वस्तू दिली जाणार आहेत. सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. गरजू रुग्णांना रक्तासाठी धावाधाव करावी लागू नये यासाठी रक्तदान शिबिर आयोजित केले आहे या शिबिरामध्ये  रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes