राजेंद्रनगर विद्यालयात ४१ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी नोंदणी
schedule30 Mar 25 person by visibility 176 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी,कोल्हापूर : महापालिकेच्या राजेंद्रनगर येथील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यामंदिर येथे गुढीपाडव्याच्या दिनी ४१ प्रवेश झाले. सकाळपासूनच शाळेमध्ये छोट्या छोट्या विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची प्रवेशासाठी लगबग सुरू होती. नवीन येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक राजा पाटी, पाण्याची बाटली व चॉकलेट बिस्कीट पुडा देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. दाखलपात्र चिमुकल्यांच्या शाळेतील पहिल्या पाऊलांचे स्वागत केले. चिमुकल्यांचा सुंदर असा ‘सेल्फी पॉईंट’ घेण्यात आला.याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक उत्तम गुरव, शिक्षक व भागातील नागरिक उपस्थित होते. शिक्षिका चारुशीला बिडवे मॅडम यांनी सूत्रसंचालन केले. फलक लेखन शिक्षक नामदेव उंडे यांनी केले.