Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
राजेश लाटकरांच्या प्रचारार्थ शहरात भगवी रॅलीदत्तक घेतलेल्या वळीवडे गावाकडेही ऋतुराज पाटलांचे दुर्लक्ष: अमल महाडिकमहिलांचा सन्मान राखणाऱ्या ऋतुराज पाटील यांना विजयी करा- मधुरिमाराजे छत्रपती  करवीरवर माझं शंभर टक्के लक्ष, राहुलला आमदार करणारच  - आमदार सतेज पाटील हसन मुश्रीफांना मत हीच  गणपतराव फराकटेंना श्रद्धांजली-मनोज फराकटेंची भावनिक सादसंपतराव गायकवाड यांचे निधन, शिक्षण खात्यातील प्रामाणिक अधिकारी हरपला केपी पाटलांना विकासकामाच्या परिक्षेत शून्य मार्क मिळतील -आमदार प्रकाश आबिटकरांचा टोलामहायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गुरुवारी युवाशक्ती मेळावा, कृष्णराज महाडिकांचा पुढाकारकोल्हापूर डाक विभागाच्या प्रवर डाक अधीक्षकपदी अनुराग निखारे गुलाबी सिनेमात मैत्री, स्वप्नं अन स्वतःच्या शोधाची हृदयस्पर्शी कहाणी

केआयटी मेकॅनिकलच्या १५५ विद्यार्थ्यांची कंपन्यांमध्ये निवड.

schedule19 Jun 23 person by visibility 4442 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :   केआयटीच्या अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागाच्या अंतिम वर्षातील १५५ हून अधिक विद्यार्थ्यांची राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कॅम्पस प्लेसमेंट मधून निवड झाली आहे. 
 अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंट मधून नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांमध्ये टाटा टेक्नोलॉजीज, अदानी ग्रुप, टाटा पॉवर, टी.सी.एस, जे.एन.के, जनरल इलेक्ट्रिकल , विप्रो पारी ऑटोमेशन , अटलास कॉपको ,कारगिल फुड्स, के.एस.बी. पंप, रिगल रेक्सनोर्ड, फॉरेशिया, डी.एक्स.सी, नॉर ब्रेमसे या सारख्या प्रमुख बहुराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश आहे.
मेकॅनिकल विभागातील अंतिम वर्षाच्या सर्वच विद्यार्थ्यांचे चांगल्या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये कॅम्पस प्लेसमेंट मधून निवड होण्यासाठी विभागाकडून विद्यार्थी तृतीय वर्षात असल्यापासून अप्टीट्युड ट्रेनिंग, इंटरव्ह्यू स्किल्सचे प्रशिक्षण दिले जाते. 
विभागामध्ये प्रॉब्लेम आणि प्रोजेक्ट बेस्ड लर्निग राबवले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्न सोडविण्याची क्षमता, टीमवर्क, संभाषण कौशल्य, प्रॅक्टिकल ज्ञान मध्ये प्रगती होते. याच बरोबर प्रॅक्टिकल बेस्ड लर्निग, इंडस्ट्रिअल व्हिजीट मुळे विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक कौशल्ये विकसित होण्यामध्ये खूपच चांगला फायदा होतो.टाटा टेक्नॉलॉजीज च्या ‘रेडी इंजिनिअर प्रोग्राम’ मध्ये मागील ३ वर्षात केआयटी मेकॅनिकल विभाग देशभरात पहिल्या ३ मध्ये सातत्याने येत आहे. अशा विकसित कौशल्याचा फायदा विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यू मध्ये होत आहे.
 संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. विलास कार्जिन्नी, संचालक डॉ.मोहन वनरोट्टी, केआयटीचे अध्यक्ष  सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष,  साजिद हुदली, सचिव, दीपक चौगुले, तसेच अन्य सर्व विश्वस्त यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.
ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाचे डॉ. अमित सरकार, मेकॅनिकल विभागाचे विभागप्रमुख डॉ. उदय भापकर यांचे विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. मेकॅनिकल विभागाचे प्रा. प्रवीण गोसावी, प्रा. आशिष पाटील व प्रा. निलेश देसाई यांनी या सर्व प्रक्रियेमध्ये विशेष प्रयत्न केले.
Copyright © 2024. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes