स्त्रियाला प्रत्येक क्षेत्रामध्ये अधिक भागीदारी मिळणे आवश्यक : डॉ. मीना शेंडकर
schedule09 Mar 26 person by visibility 41 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : स्त्रियांना समान संधी ,सुरक्षितता व निर्णय प्रकिया अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये अधिक भागीदारी मिळायला हवी असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी डॉ .मीना शेंडकर यांनी
केले . त्या महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मालवण येथे आयोजित महिला मेळाव्यात बोलत होते . या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब हे लाभले होते. समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे हे अध्यक्षस्थानी होते . बॅ नाथ पै सेवांगण सभागृहामध्ये हा कार्यक्रम झाला .
प्रमुख पाहुणे जयप्रकाश परब म्हणाले की , 21 व्या शतकातील
स्त्रिया कणखर बनत असून समाजाच्या प्रगतीमध्ये महिलांचा मोठा वाटा आहे. शिक्षणापासून सामाजिक क्षेत्रापर्यंत स्त्रियांनी प्रगती साधलेली आहे .पण त्याच्या स्वप्नांना बळ देणे हे कुटुंबाचे व समाजाचे कर्तव्य आहे
अध्यक्षपदावर बोलताना भरत रसाळे म्हणाले, भविष्यकाळात दिल्लीमध्ये असा जागतिक महिला दिन साजरा करण्याचा आमच्या संघटनेचा मानस आहे. यावेळी समितीच्या कार्यकर्त्या नंदिनी कोंडेकर संपादित "स्वरकंठी "या पुस्तकाचे प्रकाशन झाले. शहराध्यक्षा चारुलता पाटील यांनी स्वागत केले. जिल्हाध्यक्षा सविता गिरी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी राकेश परब , केशव भोसले, नेहा गवंडे व कुणाल अंगणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने सर्व महिलांचे स्वागत केले. अमृता ऐतवडे यांनी सूत्रसंचालन केले. सारिका पाटील यांनी आभार मानले. यावेळी महिला शाखेच्यावतीने सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. वर्षा वायदंडे , रोहिणी एडगे , माणिक सपाटे ,विद्या पाटील ,सुनिता डावरे पद्मा सुतार ,भारती पाटील यांनी सहकार्य केले.