Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
एकवेळ सत्तेपासून दूर राहू पण काँग्रेससोबत जाणार नाही, लोकांनीच सतेज पाटलांचे फ्रंटडोअर राजकारण संपवले अकरा इच्छुकांचे एकमत, शौमिका महाडिकांना कुंभोजमधून उमेदवारी द्या : कार्यकर्त्यांनी गाठले भाजप कार्यालयसतेज पाटील महाराष्ट्राच्या राजकारणातील नवीन वाघ - खासदार शाहू महाराजपाडळी खुर्दसाठी शिवसेनेकडून सचिन पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुकीतून शिक्षकांना सवलत मिळावी काँग्रेसकडून गगनबावडा तालुक्यातील जिप - पंचायत समित्यासाठी उमेदवार जाहीरप्रा. दिनकर कबीर यांना भन्ते नागरत्नजी राज्यस्तरीय पुरस्कारकागलात राजकीय फटाके, तावरे शिवसेनेत ! राष्ट्रवादीच्या शीतल फराकटेंची  बंडखोरी, अपक्ष लढणार ! !शहीद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे कौलवमध्ये विशेष श्रम संस्कार शिबीरडीवाय पाटील कृषी- तंत्र विद्यापीठाच्या प्रकुलपतीपदी ऋतुराज पाटील

जाहिरात

 

एकवेळ सत्तेपासून दूर राहू पण काँग्रेससोबत जाणार नाही, लोकांनीच सतेज पाटलांचे फ्रंटडोअर राजकारण संपवले

schedule21 Jan 26 person by visibility 154 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : " निगेटिव्ह नरेटीव सेट करणाऱ्या बादशहाने लोकांमध्ये कितीही संभ्रम निर्माण केला तरी महापालिकेत महायुतीची सत्ता येईल. एकवेळ सत्तेशिवाय दूर राहू, पण काँग्रेससोबत जाणार नाही " असे स्पष्ट ग्वाही  राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली. "लोकांनीच, आमदार सतेज पाटील यांचे फ्रंटडोअर राजकारण संपवले आहे त्यांनी आता बॅकडोअर राजकारणच करत बसावे " असा  टोला त्यांनी लगावला.
महापालिका निवडणुकीनंतर पत्रकारांशी बोलताना आमदार क्षीरसागर यांनी निकालाचे विश्लेषण केले. कोल्हापूर महापालिका निवडणूक महायुती म्हणून लढवायचे यासाठी आपण पहिल्यापासून प्रयत्न केले. प्रसंगी एक पाऊल मागे आणि दोन पाऊल पुढे या नीतीचा अवलंब केला. दुधात मिठाचा खडा पडणार नाही यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. काही वेळेला शिवसेनेला त्याग करावा लागला, मात्र महापालिका  निवडणूक महायुती म्हणूनच लढवणार हे निश्चित केले होते. नागरिकांनी महापालिका निवडणुकीत महायुतीला भरभरून यश दिले आहे. भाजप मोठा भाऊ, शिवसेना मधला भाऊ आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष छोटा भाऊ ठरले असले तरी सत्तेमध्ये सगळ्यांना योग्य न्याय मिळेल. मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढवली. लोकांना जी जी आश्वासने दिले आहेत त्या साऱ्यांची पूर्तता करण्यावर आमचा भर राहील. महापालिकेत महायुतीची सत्ता येईल. महापौर पद  अडीच वर्षे  शिवसेनेला यासाठी आमचा नैसर्गिक दावा आहे. शिवसेनेचा महापौर होणार हे निश्चित मात्र तो पहिल्यांदा होईल नंतर होईल हे वरिष्ठ पातळीवर ठरेल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 23 जानेवारीपासून जन्मशताब्दी वर्ष आहे. शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांचे कोल्हापूर महापालिकेवर भगवा फडकविण्याचे स्वप्न होते या निवडणुकीत  भगवा फडकल्याने ते स्वप्न साकार झाले. असे क्षीरसागर म्हणाले 
 काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येण्यासंदर्भात पडद्यामागे ज्या घटना सुरू आहेत त्या कशा सांगता येतील असे विधान केले होते त्या संदर्भात पत्रकारांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, " काँग्रेसने पाच वर्ष जरी आम्हाला महापौरपद देतो म्हटले तरी आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही. एकवेळ सतेशिवाय राहू पण काँग्रेस सोबत जाणार नाही. कोल्हापूर महापालिकेत महायुतीची सत्ता येईल आम्ही सगळे एकसंध आहोत.
प्रभाग क्रमांक सात मध्ये आमदार क्षीरसागर यांचे चिरंजीव ऋतुराज क्षीरसागर यांनी निवडणूक लढवली आणि जिंकली. या निवडणुकीत आमदार पुत्रविरुद्ध कार्यकर्ता अशी लढाई असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. यासंदर्भात बोलताना क्षीरसागर म्हणाले, " ऋतुराज क्षीरसागर गेली अनेक वर्ष शिवसेना युवा सेनेच्या माध्यमातून सक्रिय आहेत. गेली पाच ते सात वर्षे ते प्रभागात काम करत आहेत. लोकांच्या संपर्कात आहेत. आमदार पुत्र म्हणून नव्हे तर एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी भागात काम केले आहे त्यामुळे लोकांनी त्यांना भरभरून मते दिली. माझा मुलगा म्हणून त्यांना महापौर करावे असा अट्टाहास  कधी धरणार नाही. पक्षाचे नेते जो निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे. या निवडणुकीत महायुतीचे सगळे नेते पदाधिकारी, कार्यकर्ते प्रामाणिकपणाने राबले. मी  स्वतः   शहरातील विविध भाग पिजून काढला. पालकमंत्र्यांचे नेतृत्व होते. शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदम, शारंगधर देशमुख  यांनीही ताकतीने काम केले. शहरातील सगळ्या पेठा या महायुती सोबत राहिल्या. दरम्यान काही ठिकाणी महायुतीच्या व शिवसेनेच्या उमेदवारांना किरकोळ मतांचा फटका बसला. काहींना उमेदवारी मिळू शकली नाही. मात्र ह्या साऱ्यांना न्याय देण्याची आमची भूमिका आहे. राज्यात सत्ता आहे. महापालिकेत सत्ता आहे त्यामुळे कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल. असे आमदार क्षीरसागर यांनी सांगितले. प्रभाग क्रमांक 12 मध्ये जातीय रंग देण्याचा प्रयत्न झाला मात्र नागरिक आमच्या सोबत राहिले. असेही त्यांनी सांगितले. महापालिका निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने ईव्हीएम जिंदाबाद असे फलक लावण्यात आले आहेत त्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता क्षीरसागर म्हणाले, " अशा पद्धतीने फलकबाजी करणाऱ्यांना मतदारांना  चोख आणि योग्य उत्तर दिले आहे. केवळ फलकबाजी करणाऱ्या विषयी काही बोलून त्यांना मोठे करण्यात अर्थ नाही. "

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes