Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
छछ दद‘टाइम टू मार्केट’ साधणाराच खरा उद्योजक, ग्रीन हायड्रोजनमध्ये मोठी संधी : कुलगुरू डॉ. राजनीश कामतराजू शेट्टी हे स्टंटबाज आंदोलक, सतेज पाटलांनी माझ्या मंत्रीपदाची काळजी करू नये - आमदार राजेश क्षीरसागरमहाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघातर्फे धरणे आंदोलनजिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातर्फे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीरशक्तीपीठ महामार्गावरुन राजू शेट्टी -राजेश क्षीरसागर समर्थक भिडले रस्त्यावरविज्ञानाच्या जगाची विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभूती, शहीद पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची रिसर्च सेंटरला भेटशिक्षणाधिकारी मीना शेंडकरांच्याकडून सात प्रकरणात कर्तव्यात कसूर, पदस्थापनेत प्रशासकीय अनियमितता ! चौकशी अहवालात ठपका ! !शिक्षणाधिकारी मीना शेंडकरांना कारणे दाखवा नोटीस, खुलासा करण्यास सात दिवसाचा अवधीपशुवैद्यकीय शिक्षणाचा केंद्रबिंदू पशुपालकांचे कल्याण असावा : मंत्री पंकजा मुंडे

जाहिरात

 

‘टाइम टू मार्केट’ साधणाराच खरा उद्योजक, ग्रीन हायड्रोजनमध्ये मोठी संधी : कुलगुरू डॉ. राजनीश कामत

schedule04 Sep 26 person by visibility 24 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : “उद्योजकतेमध्ये ‘टाईम टू मार्केट’ला अत्यंत महत्त्व आहे. जो उद्योजक इतरांपेक्षा आधी बाजारपेठेत पोहोचतो, त्याला गुंतवणुकीवरील परतावा मिळविण्याची संधी अधिक असते. योग्य वेळी तंत्रज्ञान, बाजारपेठ आणि गुंतवणुकीचे मिलाफ साधणारा उद्योजकच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो,” असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांनी केले.

ग्नॅट फाउंड्री, शिरोली एमआयडीसी येथे ‘ॲव्हलॉन पॉवर’च्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या १०० किलोवॅट क्षमतेच्या ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाच्या चाचणीचा शुभारंभ डॉ. कामत यांच्या हस्ते झाला. या प्रकल्पाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने नव्हे, तर प्रत्यक्ष पंप सुरू करून झाले. याप्रसंगी शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, ॲव्हलॉन पॉवरच्या संचालिका आशा जैन, विद्यापीठातील नवोपक्रम, इनोव्हेशन इंक्युबेशन व लिंकेजीज विभागाचे संचालक डॉ. सागर डेळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

कामत यांनी “निसर्गाला धक्का न लावता शाश्वत विकास करायचा असेल, तर त्यामध्ये हरित हायड्रोजनची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. कोल्हापूरसारख्या औद्योगिक परिसराच्या विकासात विद्यापीठाचीही महत्त्वाची भूमिका आहे. जैन कुटुंबीयांनी या प्रकल्पात गुंतवणूक केली असून त्यामध्ये नवोपक्रम हा महत्त्वाचा घटक आहे. विद्यापीठाचे उद्योग-शैक्षणिक संस्थांमधील परस्परसंवादाचे काम या क्षेत्रात महत्त्वाचे ठरेल. अशा प्रकारच्या संशोधनाला शिवाजी विद्यापीठाकडून निश्चितच पाठबळ दिले जाईल.’असे स्पष्ट केले.

ॲव्हलॉन पॉवरचे संचालक वरुण जैन यांनी प्रास्ताविकात ग्रीन हायड्रोजन निर्मितीची प्रक्रिया, त्याचे विविध उपयोग आणि त्यासाठी आवश्यक कच्च्या मालाची माहिती दिली. डॉ. सागर डेळेकर म्हणाले, विद्यापीठ आणि उद्योग एकत्र आले पाहिजेत. ॲव्हलॉन पॉवरसोबत संपर्क साधून या प्रकल्पाच्या माध्यमातून काम सुरू केले आहे. ग्रीन हायड्रोजन क्षेत्रातील संशोधनामध्ये शिवाजी विद्यापीठाचीही महत्त्वाची भूमिका राहील. कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच उद्योगविश्व आणि शिवाजी विद्यापीठ यांच्यातील सहकार्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे असे त्यांनी सांगितले.

प्र-कुलगुरू जाधव म्हणाल्या, ‘ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाची सुरुवात कोल्हापुरातून होत आहे आणि या प्रकल्पात शिवाजी विद्यापीठ महत्त्वाचा भागीदार आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.’ या कार्यक्रमाला कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी, सचिव नितीन वाडीकर, खजिनदार प्रसन्नकुमार तेरदाळकर, मॅकचे अध्यक्ष मोहन कुशिरे, सतीश कडूकर, स्मॅकचे अध्यक्ष जयदीप चौगले, खजिनदार बदाम पाटील,  अतुल पाटील,  एम. वाय. पाटील, भीमराव खाडे, प्रवीण पटेल, रामराजे बदले, कोल्हापूर फर्स्टचे सचिव बाबासो कोंडेकर, सहसचिव जयदीप पाटील, खजिनदार पद्मसिंह पाटील, नेमचंद संघवी, कोल्हापूर चेंबरचे उपाध्यक्ष राजू पाटील, भरत ओसवाल, उद्योजक जितेंद्र राठोड, ॲव्हलॉन पॉवरचे अभियंता सुबोध पांगावकर,  विद्यापीठातील संशोधक प्रा. डॉ. ज्योतिप्रकाश यादव, डॉ. प्रमोद कोयाळे, डॉ. हेमराज यादव, प्रा. के. डी. सोनवणे व डॉ. आय. आर. उडचणा उपस्थित होते. बाळ पाटणकर यांनीही शुभेच्छा दिल्या. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले.  ॲव्हलॉन पॉवरचे विक्री व विपणन प्रमुख प्रवीणकुमार आंबेसकर यांनी  आभार मानले.  

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes