Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातर्फे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीरशक्तीपीठ महामार्गावरुन राजू शेट्टी -राजेश क्षीरसागर समर्थक भिडले रस्त्यावरविज्ञानाच्या जगाची विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभूती, शहीद पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची रिसर्च सेंटरला भेटशिक्षणाधिकारी मीना शेंडकरांच्याकडून सात प्रकरणात कर्तव्यात कसूर, पदस्थापनेत प्रशासकीय अनियमितता ! चौकशी अहवालात ठपका ! !शिक्षणाधिकारी मीना शेंडकरांना कारणे दाखवा नोटीस, खुलासा करण्यास सात दिवसाचा अवधीपशुवैद्यकीय शिक्षणाचा केंद्रबिंदू पशुपालकांचे कल्याण असावा : मंत्री पंकजा मुंडेजिल्हा परिषदेत गणेशोत्सव साजरा करणार, पदाधिकारी- सदस्यांच्या बैठकीत निर्णयसंस्थामाता सुशीलादेवी साळुंखे : विवेकानंद परिवाराच्या माऊली667 दूध संस्था मतदानास पात्र, गोकुळच्या माजी चेअरमनासह संचालकांचा आनंदोत्सव जुनी पेन्शनसाठी शनिवारी  शिक्षकांचा सहकुटुंब जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा

जाहिरात

 

विज्ञानाच्या जगाची विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभूती, शहीद पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची रिसर्च सेंटरला भेट

schedule04 Sep 26 person by visibility 22 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :  चाटे शिक्षण समूहाचे व्यवस्थापन असलेले शहीद पब्लिक स्कूलच्या  विद्यार्थ्यांनी नुकतीच डी. वाय. पाटील डीम्ड युनिव्हर्सिटीच्या इंटरडिसिप्लिनरी रिसर्च सेंटरला भेट देत विज्ञान व संशोधनाच्या जगाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. विशेष म्हणजे  विज्ञान शिबिर २०२६ अंतर्गत शाळेतील १० विद्यार्थ्यांची निवड झाली होती, या विद्यार्थ्यांनी या भेटीदरम्यान संशोधन प्रक्रियेची माहिती घेतली.

विद्यार्थ्यांनी सायन्स बेस्ड रिसर्च कशा पद्धतीने केला जातो, संशोधन प्रयोगशाळांमध्ये कोणत्या पद्धतीने प्रयोग केले जातात, याची माहिती जाणून घेतली. तसेच अभ्यासक्रमाशी संबंधित काही प्रयोग स्वतः करून पाहिले. यावेळी विद्यार्थ्यांनी वैज्ञानिकांशी संवाद साधत विज्ञान व संशोधन क्षेत्रातील अनेक रंजक गोष्टी जाणून घेतल्या.

या भेटीमुळे विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या जगाची प्रत्यक्ष ओळख झाली असून, त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा आणि संशोधनाची आवड निर्माण होण्यास मदत झाली. पुस्तकी ज्ञानासोबत प्रत्यक्ष प्रयोगातून शिकण्याचा अनुभव विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा ठरला.

शहीद पब्लिक स्कूल गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे. विद्यानिकेतन गुणवत्ता शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शहीद पब्लिक स्कूलने अनेक अधिकारी,इंजिनियर्स ,डॉक्टर्स व विविध क्षेत्रातील यशवंत घडविले आहेत. त्यामुळे केजीपासून ते पीजीपर्यंत अभ्यासक्रम उपलब्ध असलेले एक अतिशय सुरक्षित व आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे शैक्षणिक संकुल शहीद परिवाराने तिटवे सारख्या खेडेगावात उभे केले आहे. या विद्यार्थ्यांना शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील,शहीद शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य मार्गदर्शक डॉ. जगन्नाथ पाटील,शहीद पब्लिक स्कूलचे प्राचार्य सागर भाट प्रा. दीपाली किल्लेदार यांचे मार्गदर्शन मिळाले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes