जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातर्फे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
schedule04 Sep 26 person by visibility 15 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे शिक्षक दिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या ‘डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण जिल्हा शिक्षक पुरस्कार २०२६ - २७’ घोषित केले आहेत. जिल्हास्तरीय निवड समितीची गुरुवारी तीन सप्टेंबर रोजी सभा झाली. तत्पूर्वी जिल्हास्तरावरील मुलाखतीसाठी पात्र शिक्षकांची ५० गुणांसाठी मुलाखत व गुणाकंन केले.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जिल्हा शिक्षक पुरस्कार मुख्याध्यापक महादेव पांडूरंग गुरव विद्या मंदिर शिये हनुमाननगर, अध्यापिका रुपाली विश्वास चौगले केंद्रशाळा कूर, विद्यामंदिर तिरवडे येथील विषय शिक्षक अंकुश कुंडलिक पाटील यांना विभागून पुरस्कार दिला आहे. गगनबावडा तालुक्यातील विद्यामंदिर निगडेगाव येथील अध्यापक मारुती तुकाराम पाटील यांना मिळाला. चंदगड तालुक्यातील विद्यामंदिर जांबरे येथील अध्यापक दिपक सातेरी गोरे व विद्यामंदिर दिंडलकोप येथील अध्यापक अशोक बाळकृष्ण नौकुडकर यांना विभागून पुरस्कार जाहीर झलाला. शाहूवाडी तालुक्यातून केंद्रशाळा शित्तूर वारणा येथील अध्यापक मारुती मधुकर गुरव व विद्यामंदिर येथील अध्यापक विठठल पाटील यांना विभागून पुरस्कार आहे. राधानगरी तालुक्यातून केंद्रशाळा येथीलअध्यापक प्रकाश शंकर पाटील, आजरा तालुक्यातून आजरा विद्या मंदिर येथील अध्यापक संतोष मारुती गुरव, गडहिंग्लज तालुक्यातून विद्यामंदिर येथील अध्यापक सुनिल पुंडलिक सुरंगे यांना जाहीर झाला.पन्हाळा तालुक्यातून विद्यामंदिर येथील अध्यापिका शोभा लालासाहेब पाटील, व विद्यामंदिर येथील अध्यापक आनंदा बंडू म्हाळुंगेकर यांना विभागून हा पुरस्कार दिला. कागल तालुक्यातून केंद्रशाळा येथील अध्यापक तुकाराम दत्तू इंगवले, शिरोळ तालुक्यातून कुमार विद्या मंदिर दानोळी येथील मुख्याध्यापक देवाप्पा आकाराम गावडे, हातकणंगले तालुक्यातून कन्या विद्यामंदिर येथील अध्यापक आनंदा दादू घाटगे व विद्या मंदिर येथील अध्यापक सागर रघुनाथ पाटील यांना पुरस्कार विभागून जाहीर झाला आहे.विशेष जिल्हा पुरस्कार अंतर्गत विद्या मंदिर गर्जन येथील विषय शिक्षक संजय राजाराम रोगे यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.यंदा प्रोत्साहन जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये करवीर तालुक्यातील कुमार विद्या मंदिर कोगे येथील अध्यापिका निता अभिजीत पाटील, राधानगरी तालुक्यातील विद्या मंदिर पडळी येथील मुख्याध्यापक मधुकर शिवाजी मुसळे, गडहिंग्लज तालुक्यातील विद्या मंदिर हिरलगे येथील अध्यापक नंदकुमार हरी देसाई आणि शिरोळ तालुक्यातील केंद्रीय विद्या मंदिर कन्या अकिवाट येथील अध्यापिका अर्चना अजित पाटील यांना प्रोत्साहनपर जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत.प्राथमिक शिक्षणाधिकारी अशोक घुगे यांनी हे पुरस्कार जाहीर केले आहेत.