Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
स्वातंत्र्यदिनापासून धावणार ई बसेस ! कोल्हापुरात होणार सिमेंटचे रस्ते !! कोल्हापूर जिल्ह्यातील २५१ गावांना ७६ कोटी मंजूरमहापुराच्या उपाययोजनेसंबंधी दोन खासदार, सात आमदारांचे जलसंपदामंत्र्यांना पत्रऋतुराज पाटील यांच्यावर वाढदिवसानिमित शुभेच्छाचा वर्षावगोकुळची निवडणूक महायुती म्हणून लढणार, मंत्री मुश्रीफ आमच्या सोबत असतील - धनंजय महाडिकवडिलांना मिठी मारताच नवीद मुश्रीफ झाले भावूककोल्हापूर महानगर भाजप अध्यक्षपदी विजय जाधवस्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडी सरसावली, नेतेमंडळीची पदाधिकाऱ्यांच्यासोबत संयुक्त बैठक जागतिक स्तरावरील कॅन्सर उपचार आता कोल्हापुरात !णणजझ त

जाहिरात

 

गोकुळच्या अध्यक्षपदी नविद मुश्रीफ ! निवडीनंतर म्हणाले गोकुळची गाडी वापरणार नाही

schedule30 May 25 person by visibility 559 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अध्यक्ष निवडीवरुन शह-काटशहाचे राजकारण,सत्ताधारी आघाडीतील अस्वस्थता, वरिष्ठ नेत्यांचा
हस्तपेक्ष आणि नेते मंडळीसाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ यांची निवड झाली. गोकुळ
शिरगाव येथील गोकुळ दूध प्रकल्प येथील सभागृहात शुक्रवारी (३० मे २०२५) निवडीची प्रक्रिया पार पडली.
गोकुळचा अध्यक्ष महायुतीचा की महाविकास आघाडीचा ? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. गोकुळमधील सत्ताधारी आघाडीचे नेते मंत्री हसन
मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार के. पी.
पाटील, माजी आमदार संजय घाटगे यांची अध्यक्ष निवडीसाठी गुरुवारी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत बैठक झाली. तब्बल अडीच तास
अध्यक्ष निवडीवरुन काथ्याकूट करण्यात आला. नेते मंडळींनी संचालकासोबत बैठक घेऊन, अध्यक्षपदासाठी नाव निश्चित केले आहे. शुक्रवारी
बंद लखोटयातून ते पाठविले जाईल असे संचालकांना सांगितले.
गोकुळ अध्यक्ष निवडीसाठी दुपारी तीन वाजता बैठक झाली. तत्पूर्वी सत्ताधारी संचालक मंडळाची बैठक दुपारी दोन वाजता गोकुळच्या
सभागृहात झाली. नेते मंडळींनी, पाठविलेला लखोटा ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्याकडे होता. संचालक पाटील यांनी सत्ताधारी
आघाडीच्या बैठकीत अध्यक्षपदासाठी यांचे नाव निश्चित केल्याचे जाहीर केले. याप्रसंगी विद्यमान चेअरमन अरुण डोंगळे, संचालक सुजित मिणचेकर, बाबसाहेब चौगुले,  शशिकांत पाटील-चुयेकर, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, अजित नरके, प्रा. किसन चौगले, नाविद मुश्रीफ, अभिजीत तायशेटे,
रणजित पाटील, नंदकुमार ढेंगे, करणसिंह गायकवाड, अमरसिंह पाटील, एस. आर. पाटील, अंबरिश घाटगे, बाळासाहेब खाडे, चेतन नरके, अंजना रेडेकर, स्वीकृत संचालक युवराज पाटील, आर. के.मोरे, मुरलीधर जाधव आदी उपस्थित होते. दुपारी अडीच वाजता हे सगळे संचालक एकत्रितपणे सभागृहात पोहोचले. तत्पूर्वी अजिंक्यतारा येथे गोकुळ मधील सत्ताधारी आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांनी गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्याकडे अध्यक्षपदाच्या नावाचा लखोटा सुपूर्द केला. दुपारी तीन वाजता गोकुळच्या मुख्य कार्यालयात अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली. अध्यक्षपदासाठी नविद मुश्रीफ यांच्या नावाला ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी सुचक तर तर अरुण डोंगळे हे अनुमोदक आहेत. निवडीनंतर बोलताना मुश्रीफ म्हणाले, सगळ्या नेतेमंडळींच्या सहकार्याने आपणाला तरुण वयात मोठी जबाबदारी मिळाली आहे. दूध उत्पादकांच्या हितासाठी आपण कायम कार्यरत राहो. मी यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे गोकुळ दूध संघाची गाडी वापरणार नाही.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes