कोरगांवकर संकुलात प्रवेशाची गुढी
schedule30 Mar 25 person by visibility 81 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित कोरगावकर संकुलमधील साने गुरुजी बालकमंदिर, सावित्री श्रीधर विद्यालय आणि कोरगावकर हायस्कूल येथे गुढीपाडव्याच्या दिनी प्रवेशासाठी विद्यार्थी आणि पालकांची लगबग होती. पालकांचे आणि बालकांचे यावेळी पेढा देऊन स्वागत केले. या प्रवेश मोहिमेसाठी साने गुरुजी बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका सारिका ढेरे, उपशिक्षिका संगीता माने तसेच सावित्री श्रीधर विद्यालयाचे मुख्याध्यापक राजाराम संकपाळ, चेतन रावळ सचिन कांबळे, कोरगावकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे, हेमलता पाटील, प्रभू प्रसाद रेळेकर यांचेसह तीनही ज्ञानशाखांचे बहुसंख्य शिक्षक प्रवेश प्रक्रियेसाठी हजर होते. या प्रवेशासाठी या तिन्ही ज्ञान शाखेतील शिक्षकांनी घरोघरी जाऊन पालकांचे समुपदेशन आणि सर्वेक्षण केले होते या पार्श्वभूमीवर विविध शाळांना चांगला प्रतिसाद मिळाला. शहरातील विविध शाळांमध्ये गुलाब पुष्प आणि पुष्पवर्षाव होण्याबरोबरच प्रवेशोत्सुक बालकास खाऊ आणि पालकांना चहापानाची व्यवस्था केलेली पहावयास मिळाली.