पत्नीने घेतला पतीच्या मनगटाचा चावा
schedule28 Mar 23 person by visibility 453 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
पत्नीने पतीच्या मनगटाचा चावा घेऊन जखमी केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात पत्नीच्या विरोधात गुन्हा नोंद झाला.
या गुन्ह्याची हकीकत अशी की गौरव पाटील आणि संगीता पाटील हे पती पत्नी असून त्यांच्यात सतत वाद होत असल्याने पती गौरव याने पत्नी संगीतापासून घटस्फोट मिळावा म्हणून कोर्टात अर्ज केला होता. परंतु त्यांच्या समझोता होऊन दोघे पुन्हा एकत्र रहात आहेत. गौरव हा आयटी कंपनीत काम करत असूनर संगीता मेडिकल मध्ये फार्मासिस्ट म्हणून काम करतात. पती संगीता यांनी पती गौरव यांनी घरातून काम करावे आणि स्वत:ला कामावर सोडण्यासाठी, आणि परत कामावरुन घरी घेऊन येण्यासाठी यावे यासाठी तगादा लावला होता. त्यातून त्यांचा वाद झाला. संगीता यांनी पती गौरव याला शिविगाळ करुन त्यांच्या डाव्या हाताच्या मनगटाचा चावा घेतला. त्यामध्ये ते जखमी झाले. पत्नीने चावा घेतल्याची फिर्याद गौरव यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पत्नी संगीता यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.