विद्यार्थ्यांसाठी एसटी बसेसच्या फेरीत वाढ करा, मराठा महासंघ विद्यार्थी संघटनेची मागणी
schedule23 Sep 23 person by visibility 296 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी एस. टी. बसेसच्या फेरीत वाढ करावी अशी मागणी मराठा महासंघ विद्यार्थी संघटनेने केली आहे. एसटीचे विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे यांना संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रतिक साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
अनेक विद्यार्थी हुपरी, पट्टणकडोली या ग्रामीण भागातून शहरातील शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येत असतात. शाळा, महाविद्यालय सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना रंकाळा हुपरी बस वेळेत मिळत नसलेने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. याचा विचार करून एस. टी. बसेसच्या फेरीत वाढ करणेत यावी व होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघ विद्यार्थी संघटनेच्या वतीने करण्यात आली. संघटनेच्यावतीने विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे यांना निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रतिक साळुंखे, विराज पाटील, धनंजय गायकवाड, प्रशांत निकम, ऋतुराज माने, हर्षवर्धन शिंदे, आशिष मोरे आदींचा समावेश होता.