+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustएनआयटीचे विद्यार्थी तंत्रशिक्षण बोर्डाच्या परीक्षेत अव्वल adjustजरग विद्यामंदिरमध्ये नानासो जरग यांना श्रद्धांजली adjustकोल्हापुरात ट्रक महोत्सव उत्साहात ! चेतन मोटर्स - टाटा मोटर्सचा पुढाकार !! adjustबालिश नेत्याची मुलं विशाळगड आंदोलनात का नव्हती ? सतेज पाटलांचा खासदार महाडिकांना टोला adjustसदभावना रॅलीतून प्रकटला सामाजिक एकोप्यावरील विश्वास adjustशहरातील पाणी पुरवठासंबंधी भाजप नगरसेवकांची अधिकाऱ्यांसोबत मॅरेथॉन बैठक adjustमहायुती, महाविकासला पर्याय परिवर्तन आघाडी ! पुण्यात विविध संघटना नेत्यांची बैठक !! adjustव्यवस्थापन परिषदेच्या बैठकीवर आघाडीचा बहिष्कार ! कुलगुरुंच्यावर मनमानी कारभाराचा आरोप !! adjust४२ हजार वीज कंत्राटी कामगारांना न्याय कधी मिळणार ? राज्यभर आमरण उपोषणाचा इशारा adjustप्रशासकीय कामकाजाला हवा माणुसकीचा चेहरा !
1000621806
1000615695
1000597139
1000567748
1000562876
1000551727
schedule24 Jun 24 person by visibility 150 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत देण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय यशवंत सरपंच व ग्रामपंचायत पुरस्कार घोषित केले आहेत. २०२२-२३ (कामकाज वर्ष २०२१-२२) आणि २०२३-२४ (कामकाज वर्ष २०२२-२३)अशा दोन वर्षाचे पुरस्कार जाहीर झाले. २०२२-२३ मध्ये हातकणंगले तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायतीला प्रथम तर आजर तालुक्यातील वाटंगी ग्रामपंचायतीला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. २०२३-२४ (कामकाज वर्ष २०२२-२३) मध्ये जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार कागल तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक व पन्हाळा तालुक्यातील आरळे ग्रामपंचायतीला द्वितीय पुरस्कार आहे.
२०२२-२३ (कामकाज वर्ष २०२१-२२) मधील यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार पुढीलप्रमाणे, तालुकानिहाय प्रथम व द्वितीय क्रमांक : आजरा-वाटंगी, पेरणोली. भुदरगड- प्रथम क्रमांक, बसरेवाडी. चंदगड-प्रथम क्रमांक कारवे. गगनबावडा-प्रथम क्रमांक शेळोशी. हातकणंगले – माणगाव, पाडळी. कागल – प्रथम क्रमांक अर्जुनी. करवीर –शेळेवाडी, येवती. शाहूवाडी –भाडळे, बजागेवाडी. शिरोळ – आगर, शेडशाळ. पन्हाळा तालुक्यात प्रथम क्रमांक सातार्डे व गोलिवडे गावाला विभागून आहे. राधानगरीतही आणाजे व शेळेवाडीला विभागून पुरस्कार आहे.
२०२२-२३ (कामकाज वर्ष २०२१-२२) मधील यशवंत सरपंच पुरस्कार पुढीलप्रमाणे : शिवाजी तुकाराम नांदवडेकर वाटंगी, संदीप रंगराव पाटील बसरेवाडी, जोतिबा वैजू आपके कारवे, प्रकाश राजाराम पाटील शेळोशी, राजू मगदूम माणगाव, वर्षा संदीप सुतार अर्जुनी, रंगराव बाबू शेळके शेळकेवाडी, संभाजी रघुनाथ पाटील भाडळे, अमोल दादासो चव्हाण आगर यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. राधानगरीत मोहन शंकर पाटील आणाजे व विलासराव विष्णू पाटील शेळेवाडी यांना विभागून पुरस्कार आहे. पन्हाळा तालुक्यातही दादासाहेब वसंतराव पाटील सातार्डे व नंदा सरदार चेचर गोलिवडे यांना विभागून पुरस्कार आहे.
२०२३-२४ (कामकाज वर्ष २०२२-२३) यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार पुढीलप्रमाणे, तालुकानिहाय प्रथम व द्वितीय क्रमांक अनुक्रमे : आजरा - खानापूर, मुरुडे. गगनबावडा - निवडे, मुटकेश्वर खडूळे. करवीर – चाफोडी, नागदेववाडी. पन्हाळा –आरळे, गोलिवडे. राधानगरी – कुंभारवाडी, खिंडी व्हरवडे. शाहूवाडीत नांदारीला प्रथम व शिरोळमध्ये आलास ग्रामपंचाायतीला प्रथम पुरस्कार आहे. हातकणंगेलत कबनूरला प्रथम क्रमांक आहे. कागलमध्ये पिंपळगाव बुद्रुकला प्रथम क्रमांक आहे. भुदरगड तालुक्यात प्रथम क्रमांक म्हसवे व पांगिरे ग्रामपंचायतीला विभागूत तर द्वितीय क्रमांक नितवडे ग्रामपंचायतीला आहे. गडहिंग्लजमध्ये औरनाळ व तनवडी ग्रामपंचायतीला विभागून प्रथम क्रमांक आहे.
२०२३-२४ (कामकाज वर्ष २०२२-२३) यशवंत सरपंच पुरस्कार : कल्पना रामचंद्र डोंगरे खानापूर ग्रामपंचायत, दगडू बापू भोसले निवडे, शोभा शंकर पोवार कबनूर, साताप्प्पा महादेव सुर्वे चाफोडी, बंडेराव दिनकर सुर्यवंशी पिंपळगाव बुद्रुक, संतोष मल्हारराव गायकवाड आरळे, स्वप्नाली दिपक कुंभार कुंभारवाडी, गौरी सुनील कांबळे नांदारी, चंद्रकांत आण्णासो दानोळे आलास यांना पुरस्कार जाहीर आहे. भुदरगड तालुक्यातील सर्जेराव कुंडलिक देसाई म्हसवे व सर्जेराव बाजीराव पाटील पांगिरे यांना प्रथम क्रमांक विभागून आहे. गडहिंग्लज तालुक्यात संदीप आप्पासाहेब पाटील औरनाळ व बसवराज मल्लाप्पा आरबोळे यांना प्रथम क्रमांक विभागून आहे.