अलमट्टीबाबत गरज पडल्यास सर्वोच्च न्यायालयात जावू- देवेंद्र फडणवीस
schedule06 Jan 25 person by visibility 30 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘अलमट्टीबाबत सरकार लक्ष ठेवून आहे. त्यासाठी समितीही स्थापन करण्यात आली आहे. समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात आला आहे. शासनाचा प्रयत्न पूरस्थिती नियंत्रणात आणण्याचा आहे. त्यासाठी आवश्यकता पडल्यास सर्वोच्च न्यायालयात जावू’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. नांदणी येथील पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक महोत्सव सोहळयासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. या महोत्सवप्रसंगी ते बोलत होते. स्थानिक आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी अलमट्टीधरणाची उंची आणि त्यामुळे होणाऱ्या परिणामाकडे मुख्यमंत्र्याचे लक्ष वधेले. त्याला अनुसरुन मुख्यमंत्री बोलत होते. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार डॉ.राजेंद्र पाटील - यड्रावकर, राहुल आवाडे, अमल महाडिक, अशोक माने, शिवाजी पाटील, माजी मंत्री सुरेश खाडे, माजी खासदार निवेदिता माने, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार प्रकाश आवाडे, जैन समाजातील आचार्य विशुद्ध सागर महाराज, मठाधिपती, दहा आचार्य महाराज, सात मुनी महाराज उपस्थित होते.