विवेकानंद कॉलेज कुशल मनुष्यबळ घडविणारे लोकप्रिय महाविद्यालय-प्राचार्य आर. आर. कुंभार
schedule05 Dec 24 person by visibility 138 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : विवेकानंद कॉलेज हे उच्च गुणवत्ता जोपासत संघटनात्मक कौशल्य विकसित करत आहे. दर्जेदार शिक्षण हे केवळ जीवन बदलणारे नाही तर मनाला कलाटणी देणारा आणि चारित्र्य घडवणारा अनुभव देत आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता ओळखून कुशल मनुष्यबळ घडविणारे, सामाजिक आणि भावनिक कौशल्ये जपणारे लोकप्रिय महाविद्यालय ठरले आहे. असे मत कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर.आर.कुंभार यांनी व्यक्त केले.
विवेकानंद कॉलेज आयोजित शैक्षणिक यात्रा २०२४ च्या उदघाटन समारंभात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे स्मृतिभवनात आयोजित दोन दिवसीय शैक्षणिक यात्रा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरणपुरक उत्पादन आणि निर्मिती, दिव्यांग गुणवत्ता गौरव, आनंददायी खेळ आणि विविध सांस्कृतिक गुणदर्शन यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी हा परिसर वेगळया अनुभवाने झळाळून निघाला गेला.
विवेकानंद कॉलेजमधील दिव्यांग विद्यार्थ्यांना नारीशक्तीच्या प्रमुख ॲड. नुसरत मुजावर यांच्या वतीने दिव्यांग दिनाचे औचित्य साधत आर्थिक मदत करण्यात आली.प्रारंभी संस्थेची प्रार्थना झाली. प्रा. शिल्पा भोसले यांनी प्रास्ताविक केले. प्राध्यापिका एस पी वेदांते आणि प्रा. माधवी देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.विश्वंभर कुलकर्णी यानी आभार मानले.