Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळकडून महिला दूध उत्पादकांसाठी नारी सन्मान विमा योजना खासगी प्राथमिकतर्फे मालवणमध्ये महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम विद्यार्थिनीशी अश्लील  वर्तन, प्राध्यापक निलंबित ! चौकशी समितीची स्थापना डीवाय पाटील अभिमत विद्यापीठाचा मंगळवारी चौदावा दीक्षांत समारंभकोल्हापूरला राज्याच्या टॉप १० शहरांत स्थान मिळवून देवू : आमदार राजेश क्षीरसागरगुरु-शिष्य प्रदर्शनाचा १५ रोजी प्रारंभ ! दुर्गा आजगावकर यांना युवा कलाकार पुरस्कार!!जिल्हा परिषद काँग्रेसच्या गटनेतेपदी एकनाथ पाटीलमहायुती म्हणून लढणार, पण नेतृत्व कोणाकडे ? भाजप- राष्ट्रवादीत चढाओढ!!राष्ट्रवादीची वेळ चुकली, शिवसेनेचा परिवहन सभापतीवर निशाणागोकुळची निवडणूक हलक्यात घेऊ नका…! – शौमिका महाडिकांचे तडाखेबंद भाषण

जाहिरात

 

विद्यार्थिनीशी अश्लील  वर्तन, प्राध्यापक निलंबित ! चौकशी समितीची स्थापना

schedule07 Mar 26 person by visibility 359 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर  : विद्यार्थिनीशी अश्लील  वर्तन केल्याची तक्रार झालेल्या केआयटी कॉलेजमधील प्रा. सौरभ जोशी यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच कॉलेज प्रशासनाने त्यांच्या विरोधात ज्या तक्रारी झाल्या आहेत त्या संबंधीची  चौकशी करण्यासाठी समिती  स्थापन केली आहे. केआयटी कॉलेजचे संचालक मोहन वनरोटी यांनी यासंदर्भातील ही माहिती दिली. प्रा. जोशी यांच्या विरोधात विद्यार्थिनीने गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यामध्ये संबंधित प्राध्यापकाने अश्लील वर्तन केल्याचे म्हटले आहे. ही घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली. दरम्यान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर केआयटी व्यवस्थापनने या साऱ्या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे . संबंधित प्राध्यापकाला तत्काळ नोकरीतून निलंबित केले तसेच त्यांच्या विरोधात झालेल्या तक्रारीची अनुषंगाने चौकशी करण्यासाठी एका समितीची ही स्थापना केली. केआयटी कॉलेजमध्ये गैरकृत्य  खपवून घेतले जाणार नाही. के आय टी ही नामांकित शैक्षणिक संस्था आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे कॉलेज म्हणून लौकिक आहे असे संचालक  वनरोटी यांनी म्हटले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes