Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिक्षक संघातर्फे राजमाता जिजाऊ आदर्श महिला शिक्षक पुरस्कार जाहीर, २९ मार्चला पुरस्कार वितरणगोकुळकडून महिला दूध उत्पादकांसाठी नारी सन्मान विमा योजना खासगी प्राथमिकतर्फे मालवणमध्ये महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम विद्यार्थिनीशी अश्लील  वर्तन, प्राध्यापक निलंबित ! चौकशी समितीची स्थापना डीवाय पाटील अभिमत विद्यापीठाचा मंगळवारी चौदावा दीक्षांत समारंभकोल्हापूरला राज्याच्या टॉप १० शहरांत स्थान मिळवून देवू : आमदार राजेश क्षीरसागरगुरु-शिष्य प्रदर्शनाचा १५ रोजी प्रारंभ ! दुर्गा आजगावकर यांना युवा कलाकार पुरस्कार!!जिल्हा परिषद काँग्रेसच्या गटनेतेपदी एकनाथ पाटीलमहायुती म्हणून लढणार, पण नेतृत्व कोणाकडे ? भाजप- राष्ट्रवादीत चढाओढ!!राष्ट्रवादीची वेळ चुकली, शिवसेनेचा परिवहन सभापतीवर निशाणा

जाहिरात

 

शिक्षक संघातर्फे राजमाता जिजाऊ आदर्श महिला शिक्षक पुरस्कार जाहीर, २९ मार्चला पुरस्कार वितरण

schedule07 Mar 26 person by visibility 421 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (माजी आमदार शिवाजीराव पाटील गट), कोल्हापूर जिल्हा शाखा व महिला शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील ३८ महिला शिक्षकांना ‘राजमाता जिजाऊ आदर्श महिला शिक्षक पुरस्कार जाहीर केले. २९ मार्च २०२६ रोजी ताराराणी विद्यापीठ परिसरातील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. अशी माहिती शिक्षक संघाचे राज्य नेते राजाराम वरुटे, खजानिस संभाजी बापट, जिल्हाध्यक्ष बबन केकरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष श्वेता खांडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुरस्कार वितरण सोहळयासाठी महापौर रुपाराणी निकम, प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. पुरस्काराचे यंदाचे चौथे वर्ष आहे. उत्कृष्ट शैक्षणिक कार्य करणाऱ्या महिला शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. प्रत्येकी तालुक्यातून तीन याप्रमाणे ३६ आणि नगरपालिका व महापालिकेतील मिळून दोन शिक्षिकांना पुरस्कारासाठी निवडल्या जातात. पुरस्कार वितरण सोहळयादिनी सकाळी ११ ते तीन या वेळेत महिला शिक्षकांचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे. दुपारी तीन वाजता पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.शाल, बुके, मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पत्रकार परिषदेला श्रावणी बोळाजे, दिपाराणी पाटील, मनिषा एकशिंगे, सतीश माळवदकर, प्रशांत पोतदार, बजरंग लगारे, बाजीराव कांबळे, प्रताप राबाडे, दत्तात्रय एकशिंगे, संजय ठाणेकर, मारुती दिंडे, साताप्पा चौगुले, संतोष कांदळकर, सर्जेराव सुतार आदी उपस्थित होते.

पुरस्कारप्राप्त महिला शिक्षकांची नावे पुढीलप्रमाणे मुख्याध्यापिका चित्रलेखा श्रीकांत कुलकर्णी - विद्यामंदिर शिरोली दुमाला, अध्यापिका हेमलता शाहू बनकर -विद्यामंदिर गडमुडशिंगी, अस्मिता अनंतराव कुलकर्णी -विद्यामंदिर नागदेववाडी, जयश्री धर्माजी निर्मळे - कन्या विद्यामंदिर दत्तवाड, अस्मिता राजाराम सुतार - दत्तनगर शिरोळ, विषय शिक्षिका शर्मिला संजय हुलिकिरे - विद्यामंदिर कोडिंग्रे, समीक्षा आनंदा पोवार - विद्यामंदिर मांडुकली, दीपाली मनोहर पोवार - पीएमश्री विद्यामंदिर असंडोली गगनबावडा, उर्मिला रघुनाथ निंबाळकर - विद्यामंदिर वेतवडे, सारिका रामचंद्र गुरव - विद्यामंदिर धामणे, सुमिता संजय देवकर - केंद्रीय प्राथमिक शाळा दाभिल, दिप्ती दामोदर यादव - विद्यामंदिर पारेवाडी, पद्मा संजयकुमार जालिहाळे - विद्यामंदिर इंगळी, वर्षा अजित पाटील - सहरानगर रुई, वनिता शिवकुमार माळी - कन्या विद्यामंदिर तळसंदे, नम्रता नंदकिशोर होडगे - नगरपालिक गडहिंग्लज, सुमन यशवंत पाटील - समर्थनगर भडगाव, राजश्री बसलिंग मगदूम - विद्यामंदिर खणदळ, रंजना तानाजी भोईगडे - विद्यामंदिर पांगिरे, स्नेहा माधव भांडवले -कन्या विद्यामंदिर राधानगरी, हर्षाली संदीप देसाई - केंद्र शाळा हेदवडे, सुजाता बाळकृष्ण मुतकेकर – विद्यामंदिर किणी चंदगड, वैशाली अशोक भोईटे –विद्यामंदिर कोरज, निर्मला सुभाष सावंत - कन्या विद्यामंदिर चंदगड यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच वैशाली शिवानंद माळी –विद्या मंदिर आणूर, मेनका विजय मेस्त्री –विद्या मंदिर हमीदवाडा, रेखा राजेंद्र पोतदार  - विद्या मंदिर व्हन्नूर, रंजना सुहास शेटे -कुमार विद्या मंदिर पोर्ले तर्फ ठाणे, वंदना अजित जाधव – विद्या मंदिर मिठारवाडी पन्हाळा, शैलजा दत्तात्रय पाटील -विद्यामंदिर तांदूळवाडी, स्वाती श्रीरंग दरबान - विद्यामंदिर कापशी शाहूवाडी, पूनम प्रशांत मोहिते - विद्यामंदिर जाधववाडी शाहूवाडी, अनिता नामदेव फुटाणे - केंद्रीय प्राथमिक शाळा आंबा, स्मिता संजय मोरे - विद्यामंदिर कासारपुतळे, जयश्री दिगंबर टिपुगडे - विद्यामंदिर वाघवडे राधानगरी, सुनिता सरदार आंबर्डेकर - कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय कदमवाडी, सुनंदा अंकुश ठोमके -विद्यामंदिर क्रमांक चौदा शहापूर इचलकरंजी यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes