+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमहाराष्ट्र दिल्लीपुढे झुकत नाही हे शाहू महाराजांनी दाखवून दिले-कपिल पाटील adjust आमदार प्रकाश आवाडे निवडणूक लढवणार, हातकणंगलेत अपक्ष उमेदवारी adjustगोकुळमार्फत सतेज पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा adjustशिक्षक बँकेतील राजकारणाचे कवित्व ! एकमेकांच्या कामकाजाचा पर्दाफाश ! adjustगोकुळच्या दूध विक्रीचा नवा उच्चांक ! दिवसभरात २२ लाख ३१ हजार लिटर दूध विक्री adjustरोटरी गार्गीजतर्फे सोळा एप्रिलला भरतनाट्यम कार्यक्रम adjustसभेच्या मान्यतेने अमृत संजीवनी योजना, विक्रमी नफ्यामुळे विरोधकांना पोटशूळ- अध्यक्ष राजेंद्र पाटील adjustनिवडणुकीचा मांडव आपल्या दारात; तिन्ही गटांचा समन्वय ठेवा-हसन मुश्रीफ adjustशक्तिपीठ महामार्ग धनदांडग्यासाठी, शेतकऱ्यांची बैलगाडी त्यावर धावणार का ? - संजय घाटगे adjustटेंबलाईवाडी विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता दर्जेदार - जिल्हाधिकारीसो अमोल येडगे
Screenshot_20240226_195247~2
schedule29 Feb 24 person by visibility 123 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्हा निवडणूक अधिकारी, कोल्हापूर यांचेवतीने २०२३ मध्ये निवडणूक साक्षरता मंडळांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये मताधिकार, लोकशाही यासंबंधी केलेली जनजागृती, त्यासाठी राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम, नवमतदार नोंदणी इत्यादी कार्याबद्दल विवेकानंद कॉलेजला महाराष्ट्र राज्याचे अप्पर मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते उत्कृष्ठ महाविद्यालय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 
हा पुरस्कार विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर.आर. कुंभार यांनी स्वीकारला. शिवाजी विद्यापीठ येथे कार्यक्रम झाला. यावेळी कोल्हापूर जिल्हयाचे अतिरिक्त्‍ जिल्हाधिकारी . संजय शिंदे, पन्हाळा प्रांत अधिकारी समिर शिंगटे, उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे, शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरु पी. एस. पाटील हे उपस्थित होते. तसेच जिल्हा नोडल अधिकारी म्हणून विवेकानंद कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.संदीप पाटील यांना उत्कृष्ठ् संपर्क अधिकारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्यशास्त्र विभागप्रमुख समीक्षा फराकटे उपस्थित होते.
यावेळी यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष  प्राचार्य अभयकुमार साळुंखे , संस्था सेक्रेटरी प्राचार्या शुभांगी गावडे, संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांनी अभिनंदन केले.