लसीकरणाच्या जागृतीसंबंधी गोकुळच्या चेअरमनासह संचालकांचे दौरे
schedule21 Sep 22 person by visibility 443 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : लम्पीस्कीनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) जनावरांना मोफत लसीकरण सुरू केले आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जनावरांना लसीकरण करुन घ्यावे यासाठी जागृती करण्यासाठी गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांच्यासह संचालक दौरे करत आहेत. शेतकऱ्यांना भेटून लसीकरणाचे महत्व पटवून देत आहेत.
चेअरमन पाटील, संचालक बाळासाहेब खाडे, संघांचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दळवी व जिल्हा परिषद पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. वाघमोडे यांनी बोलोली परिसरातील ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी, सेवा संस्था सदस्यांची बैठक घेतली.
रामनाथ पाटील, सहायक दूध संकलन अधिकारी आर.आर.पाटील, संघ सुपरवायझर सुनिल पाटील, एस.आर. पाटील, भिकाजी वडणगेकर, शरद अतिग्रे, जनार्दन पाटील यांच्यासह दूध संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.