चांदेकरवाडीच्या कुस्ती मैदानात सुभाष निऊंगरेचा प्रेक्षणीय विजय
schedule27 Sep 23 person by visibility 353 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडी येथील अंबाबाईच्या पोथी समाप्ती निमित्त आयोजित केलेल्या कुस्ती मैदानामध्ये, पैलवान सुभाष निऊंगरे (मोतीबाग तालीम) याने, प्रतिस्पर्धी पैलवान, सुयश पाटील म्हारूळ याच्यावर पाचव्या मिनिटाला एकचाक डावावर विजय मिळवून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. शेवटची कुस्ती निकाली झाल्याबरोबर, वरूण राजा बरसु लागला. त्यामुळे चांदेकरवाडी ची कुस्तीची परंपरा अखंडित राहिली.
क्रमांक दोन च्या कुस्तीमध्ये, पैलवान नेताजी भोसले गोरंबे याने रुपेश पाटील इचलकरंजी याच्यावर विजय मिळवला. या मैदानामध्ये लहान मोठ्या दीडशेहून अधिक प्रेक्षणीय कुस्त्या रंगल्या. या कुस्त्यांसहित कुस्तीशौकिनांनी अनेक पुरस्कृत कुस्त्या लावण्यात आल्या. यावेळी गाव पाटील, बाळासो खोत, आर.डी. खोत, प्रकाश खोत, वाय. सी. खोत, आनंदा खोत (पसारे), मा. सरपंच रावण खोत, नामदेव खोत, रंगराव नलवडे (पोलीस पाटील), इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
तर विजयी पैलवान असे, सोहम सुतार (वडकशिवाले), किरण पाटील (बेलवळे), अतुल मगदूम इस्पुर्ली, पंकज घेगडे कागल, हर्षवर्धन पाटील (बेलवळे), साहिल सावंत, यशवर्धन यादव, राजवीर खोत, अवधूत खोत, वरद खोत, (सर्व चांदेकरवाडी), तसेच या मैदानामध्ये महिला कुस्ती संजीवनी खोत हिने, अनुष्का कांबळे वर बाजी मारून प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
यावेळी, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे सचिव प्रकाश खोत यांच्या मार्गदर्शनाखाली, भिकाजी खोत, कृष्णात खोत, उत्तम खोत, कुलदीप खोत, संदीप खोत, अवधूत चौगुले, द.ग. पताडे, धोंडीराम खोत, भगवान यादव पंच म्हणून तर, कुस्ती निवेदन म्हणून नामदेव चौगुले यांनी काम पाहिले.