Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या घटत्या संख्येचा प्रश्न विधानपरिषदेतपालकमंत्र्यांनी बुलेट चालवत नोंदविला मिलेट महोत्सव रॅलीत सहभागशिवाजी विद्यापीठ हेच नाव कायम ठेवावे : सुप्टाची मागणीउपमुख्यमंत्र्यांच्यासोबत हद्दवाढप्रश्नी सोमवारी मुंबईत बैठक राजमाता जिजाऊ रथयात्रेचे गोकुळतर्फे स्वागतशिवाजी विद्यापीठ नावासंबंधी शिवप्रेमींची शनिवारी बैठकमहापालिकेची कोल्हापूर शहर-गांधीनगरात कारवाई, पाच हजार किलो प्लॅस्टिक जप्तथकबाकीपोटी कोटीतार्थ मार्केटमधील पाच दुकान गाळे सील भगवान महावीर अध्यासनासाठी एक लाखाची देणगी तिटवे येथे होम मिनिस्टर स्पर्धा उत्साहात ! लतिका कांबळेने जिंकली मानाची पैठणी ! !

जाहिरात

 

कुलगुरू डॉ. के. प्रथापन यांचा जीवन गौरवने सन्मान

schedule18 Jun 24 person by visibility 324 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : डी. वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ तळसंदेचे कुलगुरू प्रा. डॉ. के. प्रथापन यांना मधुमक्षिका पालन क्षेत्रातील उल्लेखनीय व निरंतर कार्याबद्दल ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. फेडरेशन ऑफ इंडिजिनस एपिकल्चरिस्टच्यावतीने केरळ येथील तिरुअनंतपूर येथे 18 जून रोजी मधुमक्षिका पालन विषयक राष्ट्रीय परिषद  झाली.
 या परिषदेत केरळ सरकारचे प्रधान सचिव आणि कृषी उत्पादन आयुक्त डॉ. बी. अशोक यांच्या हस्ते डॉ. प्रथापन यांना सन्मानित करण्यात आले. डॉ. प्रथापन हे शिक्षण, कृषी आणि संशोधन क्षेत्रात ३० वर्षाहून अधिक काळ कार्यरत आहेत.  मधुमक्षिका पालन क्षेत्रातील त्यांच्या विशेष योगदानाची दखल घेऊन त्याना ‘जीवन गौरव’पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  
डॉ. प्रथापन यांनी या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त केला. या पुरस्कारामुळे तसेच माझी जबाबदारी आणखी वाढली असून कामाला आणखी बळ मिळेल. माझ्या अनुभवाचा जास्तीत जास्त उपयोग डी वाय पाटील कृषी तंत्र विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी प्रयत्न करेन. विद्यापीठाच्या माध्यातून कृषी संशोधनासाठी जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न राहील, असे डॉ. प्रथापन यांनी सांगितले. पुरस्काराबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, कुलसचिव डॉ. जे. ए. खोत, वित्त अधिकारी सुजित सरनाईक यांनी डॉ. प्रथापन यांचे अभिनंदन केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes