फाईव्ह स्टार एमआयडीसी कारखान्यात चोरी करणाऱ्या दोघांना अटक
schedule08 Mar 23 person by visibility 588 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
फाईव्ह स्टार एमआयडीसीमधील कारखान्यातून चोरी करणाऱ्या दोघां संशयितांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक करुन तीन लाख आठ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. राज अंजूम मुल्ला, (वय २३, रा. मणेरमळा, उजळाईवाडी), अंकुश लक्ष्मण पांडागळे (५३. रा. राजेंद्रनगर) अशी अटक केलेल्या संशयितांची नाव आहेत.
संशयितांकडून बेंडिंग डाय, प्रेस डाय असा एक लाख २८ हजार रुपयांचा चोरीचा माल आणि चोरीचा माल वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली अॅपे रिक्षा, एक मोटार सायकल असा तीन लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोघां संशयितांकडे चौकशी केली असता आकाश रघुनाथ चव्हाण, दाद्या उर्फ जुबेर आयुब किल्लेदार या दोघां साथीदारांचा चोरीत सहभाग होता अशी माहिती मिळाली. त्यांचाही पोलिसांनी शोध सुरू केला आहे. संशयित राज मुल्ला याच्यावर यापूर्वी जबरी चोरीचे सहा तर दरोड्याचा एक चोरीचे दोन असे नऊ गुन्हे दाखल आहे.
पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली उप निरीक्षक शेषराज मोरे, पोलिस अंमलदार हिंदूराव केसरे, सचिन देसाई, अनिल पास्ते, सोमराज पाटील, दीपक घोरपडे, सायबर पोलिस ठाण्यातील सचिन बेंडखळे, महादेव गुरव यांनी तपास केला.