+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे. adjustमोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास राहिला नाही ! इंडिया आघाडी बाजी मारणार !! adjustजिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा
Screenshot_20240226_195247~2
schedule09 Mar 24 person by visibility 110 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : 
येथील शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर सुरू असलेल्या सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत यजमान पाटाकडील तालीम मंडळ आणि सम्राटनगर स्पोर्ट्स संघाने प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला. पाटाकडील तालीम मंडळाने स्पर्धेचे आयोजन केले आहे.
पाटाकडील तालीम मंडळाने बीजीएम स्पोर्ट्सवर ४-० असा एकतर्फी विजय मिळवला. पूर्वार्धात पाटाकडीलने ३-० अशी घसघशीत आघाडी घेतली होती. आदित्य कल्लोळीने पाचव्या आणि २९ व्या मिनिटाला तर ओंमकार मोरे याने अकराव्या मिनिटाला गोल केला. उत्तरार्धात ७५ व्या मिनिटाला ओमकार मोरे यांनी वैयक्तिक दुसरा आणि संघाचा चौथा गोल नोंदवला.
सम्राटनगर स्पोर्ट्सने वर्षा विश्वास संघाचा ५-१ असा विजय मिळवला. नितीन पवार, इमरान पठाण, सतपाल सिंग, आणि सुरज हनीमनाळे यांनी प्रत्येकी एक गोल केला. वर्षा विश्वास संघाचा एकमेव गोल विशाल सनक्के याने केला.
रविवारचा सामना-
शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध संध्यामठ तालीम मंडळ, दुपारी ४.०० वा.