ध्यास विकासाचा…साथ प्रभागाची! वैभव मानेंच्या प्रचाराला वाढता पाठिंबा !!
schedule12 Jan 26 person by visibility 46 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : प्रभाग क्रमांक दोनमधील महायुतीचे उमेदवार वैभव माने यांच्या उमेदवारीला मतदारसंघात जोरदार प्रतिसाद मिळत आहे. धडपडणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची प्रभागात ओळख आहे. महायुतीच्यामार्फत ते निवडणूक लढवित आहेत. विकासाचा ध्यास असलेल्या या कार्यकर्त्याला प्रभागाची साथ मिळत असल्याचे चित्र आहे.
प्रभाग क्रमांक दोनमध्ये निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रत्येक उमेदवार अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहे. महायुतीकडून या प्रभागात अनुसूचित जाती प्रवर्गातून वैभव दिलीप माने, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटातून अर्चना उमेश पागर, सर्वसाधारण महिला गटातून प्राजक्ता अभिषेक जाधव तर सर्वसाधारण गटातून स्वरुप सुनील कदम हे उमेदवार आहेत. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर ते निवडणूक लढत आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते पदाधिकारी उतरले आहेत. उमेदवारांनीही वैयक्तिक गाठीभेटीवर जोर दिला आहे.
अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवार वैभव माने यांचा प्रभागात चांगला संपर्क आहे.कार्यकर्ता म्हणून गेली अनेक वर्षे ते कार्यरत आहेत. २०१५ मधील महापालिका निवडणुकीत त्यांच्या पत्नी कविता माने या नगरसेविका झाल्या होत्या. पाच वर्षाच्या कालावधीत माने पती-पत्नी यांनी प्रभागात अनेकविध कामे केली. पायाभूत सुविधा निर्माण केल्या. महत्वाचं म्हणजे नागरिकांच्या मदतीला धावून जाण्याची त्यांची वृत्त आहे. महापुराची आपत्ती, कोरोनाचे संकट या कालावधीत त्यांनी नागरिकांना आधार दिला. वैद्यकीय सुविधा मिळवून दिल्या. महापुराच्या कालावधीत पूरबाधित नागरिकांना ज्या ठिकाणी स्थलांतरित केले होते, त्या ठिकाणी या दोघांनी मुक्काम ठोकला. नागरिकांना कोणत्या गोष्टीची कमतरता भासणार नाही याची काळजी घेतली. त्यांनी भागात केलेल्या कामाची लोक आता प्रचाराच्या कालावधीत आठवण करुन देतात. ‘संकटकाळात तुम्ही आमच्यासोबत होता, आता आम्ही तुमच्यासोबत राहणार’ अशी ग्वाही देत आहेत.