पतीपाठोपाठ पत्नीचे निधन
schedule04 Jan 26 person by visibility 104 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर, ः कसबा बावडा येथील सुरेखा विश्वास चौगले (वय ५५) यांचे निधन झाले. पतीपाठोपाठ त्यांचे निधन झाल्याने कसबा बावडा परिसरात हळहळ व्यक्त झाली.
चौगले दांपत्य मुळचे कसबा बावडा येथील रहिवाशी असून कऱ्हाड येथे वास्तव्यास होते. गेल्या सोमवारी गुहागर-विजयपूर राज्य मार्गावर दोन मोटारींची समोरासमोर धडक होवून झालेल्या भीषण अपघातात त्या जखमी झाल्या होत्या. त्यांचे पती विश्वास या अपघातात जागीच ठार झाले. सुरेखा चौगले यांच्यावर कऱ्हाड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. कसबा बावडा येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. रक्षाविसर्जन सोमवारी (ता.५) सकाळी नऊ वाजता आहे. `सकाळ'चे मुख्य बातमीदार निवास चौगले यांच्या त्या वहिणी होत.