+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustडीवाय पाटील बायोटेक्नॉलॉजीच्या विद्यार्थिनींची कंपन्यामध्ये निवड adjustपार्सलमध्ये काही बेकायदेशीर नसेल तर २० लाख का दिले : शीतल फराकटे यांचा सवाल adjustजिल्हा नियोजन समितीची सभा सहा जुलैला adjustबाजार समिती सभापतिपदी जनसुराज्यचे प्रकाश देसाई, उपसभापतिपदी सोनाली पाटील adjustजिप कर्मचाऱ्यांना राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार जाहीर adjustजिपतर्फे यशवंत सरपंच- ग्रामपंचायत पुरस्कार जाहीर ! adjustकोल्हापूर जिपचे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर adjustसुनीलकुमार लवटेंचे उच्च कोटीचं दातृत्व ! समाजकार्यासाठी एक कोटीचा निधी !! adjustकेआयटीच्या स्टार्टअपची दखल, सरकारकडून पाच कोटीचा निधी मंजूर adjustशिक्षक संघातर्फे जिप अधिकाऱ्यांचा सत्कार
1000474700
1000469021
Screenshot_20240226_195247~2
schedule22 May 24 person by visibility 487 categoryलाइफस्टाइल
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : “माझी शाळा माझा फळा” समूह आणि शिवाजी विद्यापीठाचा संगीत व नाट्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २४ ते २६ मे २०२४ या कालावधीत महाराष्ट्रातील कलाकारांचे तिसरे राज्यस्तरीय अक्षर संमेलन आयोजित करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या गृह विभागाचे सहसचिव व्यंकटेश भट हे संमेलनाध्यक्ष आहेत. संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागामध्ये होणाऱ्या या संमेलनात महाराष्ट्रासह अन्य राज्यांतीलही अनेक कलाकार व कलाप्रेमी शिक्षक सहभागी होत आहेत. या संमेलनातील विविध कलाविष्कारांचा आस्वाद घेण्यासाठी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अक्षरमित्र संयोजक अमित भोरकडे, स्वागताध्यक्ष सतीश उपळावीकर आणि संगीत व नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विनोद ठाकूरदेसाई यांनी केले आहे.
 शुक्रवारी (दि. २४) सकाळी ११ वाजता शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. यावेळी चित्रकार संजय शेलार,  आयुक्त  गायकवाड (मुख्याधिकारी वर्ग–१, मनपा आयुक्त), होप फाऊंडेशनचे नरेंद्र महाडिक सहभागी होतील. दुपारी तीन वाजता कलेतून व्यवसायनिर्मिती या विषयावर परिसंवाद होईल. सायंकाळी पाच वाजता गालीचा व अक्षर रांगोळी उपक्रम होईल. यात गणेश माने (पुणे), तेजस लोखंडे (मुंबई ), प्रतिक पानसरे (पुणे), अमित भोरकडे (सोलापूर), गणेश तुपे (पुणे ) सहभागी होतील. रात्री ९.०० वाजता संगीत मैफील होईल. यामध्ये ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा फेम’  श्रीमयी सुर्यवंशी सादरीकरण करतील.
शनिवारी (दि.२५) सकाळी नऊ  वाजता फलक लेखन व व्यक्तीचित्र रेखाटन प्रात्यक्षिक होईल. यात महेश निर्मले (कोल्हापूर), अतुल गायकवाड (बारामती ), सुनील सुर्यवंशी (मुंबई), वसंत अकोलकर (अमरावती) सहभागी होतील. सकाळी १०.०० वा डीजीटल कॅलिग्राफी सादरीकरणात ज्येष्ठ सचिन गडाख (नाशिक), अमित भोरकडे (सोलापूर) तर पेन्सिल व ब्रश कॅलिग्राफीत ज्येष्ठ सुलेखनकार अनिल गोवळकर (मुंबई) सहभागी होतील. सकाळी ११.०० वा. ‘माझी कला आणि मी’ या विषयावर हेमंत घरत (मुंबई), राजेंद्र हंकारे (कोल्हापूर), सचिन सावंत (मुंबई), श्रीकांत गवांडे (मुंबई), ऋषिकेश उपळावीकर (सातारा) अशांत मोरे (कोल्हापूर) सादरीकरण करतील. दुपारी ३.३० वाजता छत्रीवरील सुलेखनाची प्रात्यक्षिके सतीश उपळावीकर (कराड), मोहन कांबळे (कोल्हापूर), दिपक गोंधळे (अहमदनगर), महेंद्र शिरोडकर (गोवा) सादर करतील. दुपारी ४.३० वाजता लेखन साहित्य खरेदी – विक्री आयोजित केली आहे. सायं. ५.३० वाजता इंटरनॅशनल पेन प्रदर्शनास भेट देण्यात येईल. रात्री ९ वाजता संगीत व नाट्यशास्त्र विभागातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होईल.
रविवारी (दि .२६) सकाळी ७ वाजता विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हॅप्पी आर्ट मॉर्निगमध्ये वैयक्तिक कलेचे सादरीकरण होईल. सकाळी ९ वाजता भागवत सपकाळे (मुंबई), बबन माने, विजय टिपुगडे, अभिजीत कांबळे, विजय उपाध्ये (सर्व कोल्हापूर) या कलाकारांचे निसर्गचित्र प्रात्यक्षिक होईल.
दुपारी तीन वाजता अक्षर सन्मान सोहळ्याने संमेलनाची सांगता होईल. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी. टी. शिर्के यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान होणार आहे. याप्रसंगी  व्यंकटेश भट , मुख्यमंत्री कार्यालयातील सहसचिव कैलास बिलोणीकर, महसूल व वन विभागाचे सहसचिव संजय इंगळे, जिल्हाधिकारी  अमोल येडगे, विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार  आदी उपस्थित राहणार आहेत.