Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
अण्णा भाऊ साठेंच्या साहित्यात मानवतेसाठी जगणाऱ्या माणसाची कहाणी - प्रा. जयसिंग दिंडेराजर्षी शाहू महाराज : एक संक्षिप्त चरित्रच्या इंग्रजी आवृत्तीचे जपानी शिक्षणतज्ज्ञांकडून कौतुककोरे पॉलिटेक्निक येथे विद्यार्थी परिचय - मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहातबाळूमामा देवस्थानमधील गैरव्यवहारातील आरोपींना अटक करा, अन्यथा रास्ता रोको आंदोलन – डॉ. युवराज येडूरेजैन समाजाच्या हितासाठी दक्षिण भारत जैन सभेचे योगदान महत्वपूर्ण, माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील - पालकमंत्री प्रकाश आबिटकरजिल्ह्यातील सगळे दिग्ग्ज सत्तेत…राजकारणात माझ्यासारखा विरोधक एखादाच… मलाही सांभाळून घ्या ! सतेज पाटलांना मुश्रीफांच्या शुभेच्छा…प्रकाशअण्णा राजकारणात धुरंधर ! ! शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षितता -आरोग्याला प्राधान्य देण्याची गरज :  शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंतड्रायव्हर सीटवर खासदार, बसमध्ये नगरसेवक ! पीएमईच्या नव्या वाहनातून फेरफटका !!ब्राह्मण सभा करवीर मंगलधामतर्फे चार ऑगस्टपासून संतांचे संगती निरुपण सोहळा राज्यव्यापी व्यापारी परिषदेला राज्यातून प्रतिनिधी उपस्थित राहणार

जाहिरात

 

अण्णा भाऊ साठेंच्या साहित्यात मानवतेसाठी जगणाऱ्या माणसाची कहाणी - प्रा. जयसिंग दिंडे

schedule03 Aug 26 person by visibility 17 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी साहित्यातून मानवतेसाठी जगणारा खंदा माणूस उभा केला. त्यांचे जीवन संघर्षमय आणि वेदनेने भरलेले होते.साहित्याच्या सर्व प्रकारात त्यांनी मुशाफिरी केली. त्यांनी साहित्यातून समता, स्वातंत्र्य, बंधुता तसेच मानवतेसाठी  झटणाऱ्या माणसााची कहानी मांडली.’असे मत न्यू कॉलेजचे प्रा जयसिंग दिंडे यांनी व्यक्त केले. कोल्हापूर महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण कॉलेजमध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी अण्णा भाऊ साठे यांच्या  साहित्यिक व्यक्तिमत्वाची ओळख करुन देणाऱ्या भित्तीपत्रिकाचे उद्घाटन आणि ग्रंथ प्रदर्शन भरविले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. दिंडे उपस्थित होते. त्यांनी भाषणातून, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्याचाा आढावा घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रशांत नागावकर होते.प्रा. डॉ. व्ही. बी. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. छाया माळी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अस्मिता लवेकर यांनी आभार मानले. मराठी विभागातर्फे वाचन लेखन प्रेरणा दिनाचे आयोजन केले होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes