राज्यस्तरीय हँण्डबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ
schedule23 Mar 24 person by visibility 817 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या शतक महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आयोजित ४९ व्या राज्यस्तरीय वरिष्ठ ( पुरुष गट) हँडबॉल स्पर्धेला शनिवारी सुरुवात झाली. आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले.महाराष्ट्र स्कूलच्या मैदानावर या स्पर्धा होत आहेत. या स्पर्धेमध्ये राज्यभरातील २२ संघानी सहभाग घेतला आहे. स्वर्गीय आमदार चंद्रकांत जाधव चषक या नावांनी स्पर्धा होत आहे.
प्रिन्सेस शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे चेअरमन के.जी पाटील, संचालक विनय पाटील, सविता पाटील, दश्मिता सत्यजित जाधव, न्यू कॉलेजचे प्राचार्य व्ही एम पाटील, महाराष्ट्र हँण्डबॉल असोसिएशनचे सचिव रणधीरसिंह, आर. डी. पाटील, खजानिस वाय. एस. चव्हाण,एस. व्ही. सुर्यवंशी, सयाजी पाटील, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्रीफळ वाढवून स्पर्धेल प्रारंभ झाला. यावेळी आयोजन समितीचे प्रदीप साळोखे, अमित शिंत्रे, संदीप पाटील, विवेक मिसाळ आदी उपस्थित होते. संजय मोरे यांनी सूत्रसंचालन केले. उद्घाटनानंतर कोल्हापूर जिल्हा संघ आणि वर्धा संघात सामना झाला. हा सामना कोल्हापूर संघाने जिंकला.