Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
बिनविरोधच्या चर्चेत तथ्य नाही, गोकुळची निवडणूक ताकदीने लढवणार-  आमदार सतेज पाटीलउद्योग क्षेत्रातील नवीन संधीविषयी कोल्हापुरात दोन दिवसीय विशेष कार्यक्रमकिकवी खरेदी व्यवहाराची स्वतंत्रपणे ईडीमार्फत  चौकशी करा - राजवर्धन नाईक निंबाळकरसंच मान्यता  त्रुटी  दुरुस्तीसाठी शिक्षण उपंचालकांसोबत चर्चा कोल्हापूर फर्स्टतर्फे जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार ! कोल्हापुरात पश्चिम महाराष्ट्र विकास परिषद भरविणार !!डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ६८ विद्यार्थ्यांना जॉब ऑफर्सतंत्रज्ञान युगात जीआयएसचे कौशल्य आत्मसात करणे आवश्यक : कुलगुरू  डी. टी. शिर्केमार्केट सेस चालूच राहणार, कोल्हापूर बाजार समितीचे राष्ट्रीय बाजार समितीत वर्गीकरण नाही - मंत्री जयकुमार रावळ सार्वजनिक कार्यक्रमात अश्लिल - आक्षेपार्ह नृत्य सादरीकरणास प्रतिबंध करा - कलापथक निर्माता असोसिएशनराज्यस्तरीय तेली समाजाच्या व्यासपीठावर मंत्री बावनकुळे - विजय वडेट्टीवारांच्यामध्ये राजकीय जुगलबंदी ! पक्ष प्रवेशाची ऑफर, एक नंबर मंत्रीपदासाठी शुभेच्छा!!

जाहिरात

 

खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचा १०० कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण- चेअरमन मच्छिंद्र नाळे

schedule18 Jun 25 person by visibility 593 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेने शंभर कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण केला अशी माहिती संस्थेचे चेअरमन मच्छिंद्र नाळे यांनी दिली. पतसंस्थेचे संस्थापक भरत रसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था गेली तीस वर्ष कार्यरत आहे .संस्थेने चालू आर्थिक वर्षात संस्थेकडे १०० कोटीच्या ठेवी जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते . संस्थापक रसाळे यांच्या पारदर्शी आणि काटकसरीच्या मार्गदर्शनामुळे आणि ठेवीदारांच्या विश्वासामुळे आर्थिक वर्षाच्या सुरवातीलाच संस्थेने हा टप्पा पूर्ण केला आहे.

संस्थेने ठेवीदारांच्या ठेवीवर योग्य मोबदला व वेळेवर परतावा देऊन एक विश्वासार्हता निर्माण केली. त्यामुळे व्यवहार वाढून संस्थेस तीन कोटी पाच लाखावर नफा झाला आहे. संस्थापक भरत रसाळे  म्हणाले, सुरवातीपासून स्वभांडवलावर संस्था चालवण्याचे ध्येय ठेवून शहर कार्यक्षेत्रात सुरु झालेल्या  संस्थेने  पाच हजार रुपया पासून ठेवीचा सुरू केलेला आपला प्रवास आज १०० कोटी पर्यंत नेऊन ठेवला आहे. संस्थेची उलाढाल  ५८४ कोटींवर गेलेली आहे .  तसेच संस्थेची  स्वमालकीची २ कोटीची इमारत, राखीव निधी ३ कोटी ७५ लाखावरआहे .सभासद, ठेवीदार, हितचिंतक या सर्वांबरोबरच जनमानसात संस्थेने आपली एक विश्वासाहर्ता निर्माण केलेने १०० कोटी ठेवी जमा करण्याचे ध्येय साध्य झाले. सध्या प्रत्येक सभासदास ४५ लाख कर्ज वाटपा बरोबर  शंभर टक्के कर्ज वसुलीचे ध्येय ठेऊन उद्दिष्ट पूर्तीचे कार्य करत आहे."
संस्थेच्या या यशामध्ये माजी चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव, संचालक मंडळ व सल्लागार समिती सदस्यांची साथ मोलाची ठरली.  

विद्यमान व्हाइस चेअरमन कृष्णात चौगले, सचिव  वर्षाराणी वायदंडे, संचालक सूर्यकांत बरगे ,सर्जेराव नाईक,  माधुरी घाटगे, शिवाजी सोनाळकर, साताप्पा कासार, वसंत पाटील ,राजेश कोंडेकर, महादेव डावरे, रोहिणी यडगे, अमित परीट, संतोष आयरे, राजेंद्र कोरे त्याचबरोबर सल्लागार समिती सदस्य संभाजी सुतार ,आप्पासाहेब वागरे ,पंडित मस्कर, चंद्रकांत वाकरेकर ,दशरथ कांबळे विद्या पाटील, कार्यकारी संचालक सदाशिव साळवी व  कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes