+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे. adjustमोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास राहिला नाही ! इंडिया आघाडी बाजी मारणार !! adjustजिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा
Screenshot_20240226_195247~2
schedule27 Sep 22 person by visibility 410 categoryउद्योग
चेअरमन विश्वास पाटलांच्या नेतृत्वाखाली गोकुळच्या संचालक मंडळाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :“लम्सीस्कीन बाधित जनावरांची विलगीकरण व छावणी तयार करणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत मार्फत लम्पीस्कीनबाबत जनजागृती व्हावी. ग्रामपंचायत मार्फत डास, माश्या,गोचीड, कीटक-नाशक यांचा प्रतिबंधात्मक औषधाची फवारणी करुन स्वच्छता मोहीम राबवावी” यासह अन्य महत्वपूर्ण मागण्या कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) संचालक मंडळाने राज्य सरकारकडे केल्या.
गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जाउन लम्पीस्कीनसंबंधी प्रभावी उपाययोजना कराव्यात असे निवेदन सादर केले. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासोबत उपाययोजनेविषयी चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात वेगवेगळया मागण्यांचा समावेश आहे.
यामध्ये ‘गांवामध्ये आढळून आलेल्या लम्पीबाधित जनावरांच्या नोंदी ग्रामपंचायतमार्फत होउन त्याची माहिती पशुसंवर्धन विभागास कळवावी. मृत जनावरांचा मृतदेह उघड्यावर न टाकता शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीने घ्यावी. बाहेरून जिल्ह्यातून येणाऱ्या जनावरांचे लसीकरण केल्याची खात्री करूनच प्रवेश द्यावेत. लम्पी आजार हा फक्त गाय वर्ग मध्ये होत असल्याने बाहेर राज्यातून म्हैशी खरेदीस सरकारने परवानगी द्यावी.’ या मागण्यांचा समावेश आहे.
 जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त,मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व तालुक्याती बीडीओ व तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची गोकुळच्या संचालक मंडळासोबत व अधिकाऱ्यासोबत आढावा बैठक घ्यावी अशी मागणी केली. जिल्हाधिकारी रेखावार यांनी लम्पीस्कीनच्या प्रतिबंधासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशा सूचना जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व तालुक्यातील बी.डी.ओ व तालुका पशुवैद्यकीय अधिकारी ग्रामपंचायत, पोलीस पाटील यांना देण्यात आल्याचे सांगितले.
शिष्टमंडळात जेष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक नवीद मुश्रीफ, माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले,संघाचे पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ.यु. व्ही. मोगले, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश दळवी, पशुसंवर्धन उपआयुक्त वाय. ए. पठाण, उपस्थित होते.