कोल्हापूर उत्तरसह पाच जागा हव्यात ठाकरे गटाला ! कार्यकर्त्यांच्या बैठकीत आग्रह!!
schedule22 Jun 24 person by visibility 382 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये शिवसेना - उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशालच पाहिजे असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. तसेच कोल्हापूर उत्तर जिल्ह्यातील पाच विधानसभा जागा मिळायला हव्यात असा आग्रह बैठकीचा होता.
उत्तर विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची शनिवारी 22 जून रोजी सर्किट हाऊस येथे झाली. शिवसेना उपनेते जिल्हाप्रमूख संजय पवार बैठकीचे अध्यक्षस्थानी होते.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची जागा ही अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे होती. परंतु छत्रपती शाहू महाराजांना महाविकास आघाडी म्हणून कॉंग्रेसची उमेदवारी देण्यात आली. शिवसेना पक्षप्रमु उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार सर्वह कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून छत्रपतींना विजयी करण्यात सिंहाचा वाटा उचलला.उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत आमदार जयश्री जाधव यांना विजय करण्यात सुध्दा शिवसेनेचे कार्यकर्ते आघाडीवर होते. दोन्ही निवडणूकीमध्ये शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी आघाडी धर्म प्रामाणीकपणे पाळला. उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये पाच वेळा शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे. तेव्हा भविष्यात होणाऱ्या विधानसभा निवडणूकीमध्ये उत्तरसह कोल्हापूर जिल्हयातील पाच विधानसभा मतदारसंघ आपल्याला मिळाले पाहिजेत अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. पुढील निवडणूकांमध्ये पैशापेक्षा निष्ठेलाच मतदार महत्व देतील हे बाकी निश्चित . ‘‘चला गद्दारांना गाडूया शिवरायांचा भगवा विधानसभेवर फडकवूया’’ अशी गर्जना सर्वांनी केली. उत्तर विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख रघुनाथ खडके यांनी लढाई जिंकण्यासाठी तयारी पूर्ण आहे का? याची माहिती घेतली
सर्व ठिकाणी बी. एल.ए, गटप्रमुख, उपशाखाप्रमुख, शाखाप्रमुख, विभागप्रमुुख, उपशहरप्रमुख आहेत का? जिथे नसतील तिथे निवड करून चार दिवसांमध्ये यादी पूर्ण करण्याची सक्त ताकीद दिली भविष्यात उत्तर विधानसभा मतदारसंघ व अन्य मतदारसंघामध्ये पक्षप्रमुख जो निर्णय घेतील तो सर्वांनी मान्य करावा व विरोधकांना चितपट करण्यासाठी सज्ज रहा अशा सूचना केल्या
या बैठकीला सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, रविकीरण इंगवले, सुनिल मोदी, हर्शल सुर्वे, विशाल देवकूळे, दत्ताजी टिपूगडे, कमलाकर जगदाळे, शशिकांत बिडकर, धनाजी दळवी, सुशील भांदिगरे, अनिल पाटील, सुरेश कदम, राहूल माळी, राजेंद्र पाटील, युवराज खंडागळे, सागर साळोखे, राजू जाधव, रविंद्र साळोखे, विराज ओतारी, सुहास डोंगरे, सागर गायकवाड, संतोश रेडेकर उपस्थित होते.
यावेळी प्रभाग क्र. 56 संभाजीनगर बसस्थानक मधील बापूसो पाटील व सचिन सकटे, यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. तसेच धनंजय महिंद्रकर यांची विभागप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली