Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कुलगुरुपदासाठीच्या अर्जांचे शॉर्टलिस्ट, २५ जणांची यादी तयार ! एप्रिलमध्ये मुलाखती ! !जिल्हा परिषदेत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनएलआयसीचे निवृत्त अधिकारी नंदकुमार जाधव यांचे निधन हरिप्रिया एक्स्प्रेसमधील कमी केलेल्या प्रवासी डब्यांची संख्या पूर्ववत करा- परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव ॲक्शन मोडवर, वर्कशॉपची केली पाहणी डीवाय पाटील अभियांत्रिकीच्या  माजी विद्यार्थ्याचे यूपीएससीमध्ये यशमहापालिकेसमोर काँग्रेसचे आंदोलन, भाजपच्या मंत्र्यांनी दिली प्रश्नांच्या सोडवणुकीची ग्वाहीकोल्हापुरात शनिवारी - रविवारी कंदमुळांचा महोत्सवसतेज पाटलांशी हातमिळवणी ही तर अफवाच, जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष महायुतीचाच - हसन मुश्रीफ एकनिष्ठेचे फळ ! गोल्डनमॅनच्या चिरंजीवला मिळाली सभापतिपदाची संधी ! !

जाहिरात

 

डीवाय  पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंगच्या दहा  विद्यार्थ्यांची क्यू-स्पायडर्स निवड

schedule06 Jan 26 person by visibility 957 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या एम.सी.ए. अंतिम वर्षातील १० विद्यार्थ्यांची यशस्वी क्यू-स्पायडर्स कंपनीमध्ये निवड झाली आहे . या विद्यार्थ्याना तीन लाख पन्नास हजार रुपये  ते नऊ लाख पन्नास हजार रुपयांपर्यंतचे  वार्षिक पॅकेज मिळाले आहे.

महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागातर्फे क्यू-स्पायडर्स कंपनीच्या कॅम्पस ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले होते. या प्रक्रियेत एम.सी.ए.चे एकूण ५४ विद्यार्थी सहभागी झाले होते. विविध लेखी, तांत्रिक व मुलाखत फेऱ्यांनंतर विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली.क्यू-स्पायडर्स ही आयटी व सॉफ्टवेअर क्षेत्रातील नामांकित संस्था असून सॉफ्टवेअर प्रशिक्षण, कौशल्य विकास व प्लेसमेंट सेवांसाठी ओळखली जाते. महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांना दिल्या जणाऱ्या तांत्रिक व सॉफ्ट स्किल्सचे प्रशिक्षणाचा  या निवड प्रक्रियेत मोठा लाभ झाला. 

यशस्वी विद्यार्थ्यांचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक डॉ. अजित  पाटील यांनी अभिनंदन केले .

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes