गोकुळमध्ये महायुतीचा दोन हजाराहून अधिक मतांनी विजय, ठरावधारकांनी सहलीवर जायची तयारी ठेवावी - हसन मुश्रीफ
schedule04 Sep 26 person by visibility 31 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘कुणी काहीही म्हणू देत गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीच्या पॅनेलचा दोन हजारांहून अधिक मताधिक्याने दणदणीत विजय होईल. दसऱ्याच्या आधीपासूनच गोकुळच्या ठरावधारकांनी सहलीवर जायची तयारी ठेवा. केडीसीसी बँकेच्या ठरावधारकांनीही वेळेवर ठराव दाखल करावेत’ असा विश्वास वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
कागलमध्ये मतदार याद्यांचे पुनरीक्षण, गोकुळ दूध संघ निवडणूक, केडीसीसी बँक निवडणूक या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या नियोजनाच्या बैठकीत मंत्री मुश्रीफ बोलत होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘मी सातत्याने सांगत होतो की आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत. महायुतीचाच विजय होऊन महायुतीचीच सत्ता येणार आहे. असे असतानाही एवढा त्रास का झाला, याचे उत्तर आजही अनाकलनीयच आहे. आज सगळ्याच गोष्टी मी बोलणार नाही.सत्याच्या या लढ्यामध्ये सबंध कोल्हापूर जिल्ह्यातून राष्ट्रवादीसह शिवसेना शिंदे गट, जनसुराज्य पक्ष या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि प्रमुखांनी भरभरून साथ आणि पाठबळ दिले. किंबहुना; संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यानेच या लढ्याला पाठिंबा दिला. त्यामुळेच हा लढा जिंकता आला.