Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गग डडगोकुळसाठी संघर्ष चिघळतोय, शासननियुक्त संचालकांच्या अध्यादेशाला समविचारीचे कोर्टात आव्हानछछ डडमुख्यमंत्री -उपमुख्यमंत्र्यांनी गोकुळ दूध संघ डॉ. डी. वाय. पाटील दूध संघ होण्यापासून वाचविला! धनंजय महाडिकांची सतेज पाटलांच्यावर बोचरी टीकासतेज पाटलांचा धनंजय महाडिकांवर पलटवार, गोकुळच्या निवडणुकीत घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलंय पाचव्या स्मृतिदिनी बाबा सावंत यांच्या आठवणींना उजाळाशिक्षण चळवळीतील मी कार्यकर्ता, शाळा - शिक्षकांसाठी राबणार! पाचही जिल्ह्यात संपर्क कार्यालय, विद्यार्थ्यासाठी डिसेंबरमध्ये शिष्यवृत्ती सराव परीक्षा !!अभाविपची विद्यापीठासमोर कुलसचिवांच्याविरोधात निदर्शने, कार्यकर्ते- सुरक्षारक्षकांत झटापटतास प्रश्नोत्तराचा की वेळकाढूपणाचा ! सिनेट सभेत एकाच प्रश्नाभोवती चर्चा, दुसऱ्या विषयांना बगल देण्याचा डाव ! !शासन नियुक्त पाच संचालक निवडीच्या वटहुकूमावर राज्यपालांची स्वाक्षरी

जाहिरात

 

गोकुळसाठी संघर्ष चिघळतोय, शासननियुक्त संचालकांच्या अध्यादेशाला समविचारीचे कोर्टात आव्हान

schedule08 Nov 26 person by visibility 17 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  -: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात शासन नियुक्त चार संचालक नेमून त्यांना मताचा अधिकारी देण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय बेकायदेशीर असून तो अध्यादेश रद्द करण्याबाबतची याचिका राजर्षी शाहू समविचारी आघाडीने रविवारी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल केली. या याचिकेवर सोमवारी (९ नोव्हेंबर २०२६) सकाळी १० :३० वाजता सुनावणी होणार आहे.  गोकुळ अध्यक्ष निवडीची सभा  दहा नोव्हेंबरला होणार आहे.

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीवरुन मोठा पेच निर्माण झाला आहे. २५ संचालक मंडळाच्या कार्यकारिणीत महाविकास आघाडीचे तेरा तर महायुतीचे बारा संचालक आहेत. अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी चौदा संचालकांची उपस्थिती आवश्यक आहे. गोकुळमधील सत्तेवरुन महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मोठा संघर्ष सुरू आहे.

राज्य सरकारने चार शासननियुक्त संचालक नेमून त्यांना मताचा अधिकार देण्याच्या अध्यादेशाला मंजुरी दिली आहे. राज्यपालांनीही त्याचा वटहुकूम काढला आहे. मात्र, हा वटहुकूम बेकायदेशीर असून तो रद्द करावा अशी मागणी समविचारी आघाडीने याचिकेत केली आहे.   गोकुळ नवीन अध्यक्षांची निवडणूक  मंगळवारी सकाळी ११ वाजता  पार पाडण्याचे आणि त्यासाठी २५ संचालकांना उद्याच्या सुनावणीची नोटीस महायुतीच्या १२ संचालकांना लागू करण्यास कोर्टाने सांगितले आहे.

समविचारी आघाडीने म्हटले आहे, ‘महायुतीचे काही संचालक जाणीवपूर्व नोटीस लागू होवू नये म्हणून घरी नोटीस घेऊन गेलेल्या व्यक्ती कडून नोटीस स्वीकारत नाहीत कारण आम्हाला कोर्टाची कोणतीही नोटीस घेवू नका अशा सक्त सूचना महायुतीच्या संचालकांनी घरच्या लोकांना दिलेल्या आहेत. महायुतीच्या १२ संचालकांचे मोबाईल क्रमांक बंद असून काही संचालकांचे  कुटुंबिय नोटीसा स्वीकारत नाहीत, काही संचालकांनी व्हॉटसपला ब्लॉक केले आहे असे सांगत राजर्षी समविचारी आघाडीने रविवारी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरही आज सोमवारी सकाळी १० :३० वाजता सुनावणी होणार आहे.’

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes