गुरुबाळ माळी यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रदान
schedule09 May 23 person by visibility 284 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार यंदा पत्रकार गुरुबाळ माळी यांना प्रदान करण्यात आला. जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी विविध पुरस्कारांचे वितरण झाले. पत्रकारितेतील योगदानाबद्दल माळी यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी जेष्ठ पत्रकार दशरथ पारेकर, शिवराज काटकर, अविनाश कोळी. दिनराज वाघमारे, विद्या माळी, संपतराव पवार उपस्थित होते.