+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा !
Screenshot_20240226_195247~2
schedule29 May 23 person by visibility 218 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : 
नरसिंहवाडी येथे श्नी दत्तराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सातवी महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धा दहा जून ते बारा जून या कालावधीत हॉटेल मंगलम हॉल येथे आयोजित केली आहे अशी माहिती  महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष अरूण केदार,सचिव यतीन ठाकूर, जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष अॅड विवेक घाटगे, दत्तराज ट्रस्ट अध्यक्ष श्नी भालचंद्र पुजारी यांनी दिली 
 महाराष्ट्र ‌ राज्य कॅरम असोसिएशन व कोल्हापूर जिल्हा अॅम्युचर कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने स्पर्धा होणार आहेत.
स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंनी आपली नांवे कोल्हापूर जिल्हा कॅरम असोसिएशनचे सचिव विजय जाधव यांच्या कडे गुरूवारी एक जून रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत नोंदवावीत.  कॅरम स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त कॅरमपटूंनीं सहभागी व्हावे  असे आवाहन संयोजकांनी केले आहे. 
या स्पर्धेचे वैशिष्ट्ये म्हणजे महाराष्ट्रातील जागतिक कॅरम विजेतेपद मिळविलेले, कॅरमपटूं, तसेच श्नी शिवछत्रपती पुरस्कार विजेते , संदीप दिवे, प्रशांत मोरे, योगेश परदेशी, प्रकाश गायकवाड, संदीप देवरूखकर महमंद गुफ्रान ,अनिल मुंढे, योगेश धोंगडे, रियाज अकबर, कोल्हापूर चे, रोहित साळोखे, गौरव हुदले, अख्तर शेख, इक्बाल बागवान तर महिला मध्ये आंतरराष्ट्रीय, श्नी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त कॅरमपटूं,काजल कुमारी,आंकक्षा कदम,निलम घोडके, अंबिका हरिथ, प्राजक्ता नारायणकर आऐशा महमंद,मेधा गडकरी, शोभा कामत असे नामांकित खेळाडू सहभागी होत आहेत. या स्पर्धा आतंरराष्ट्रीय पंच अजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहेत. तरी सर्व कॅरमपटूंनीं आपली नावे प्रवेश फी प्रा.विराज जाधव (मो.नंबर 9921689789) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.