+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे. adjustमोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास राहिला नाही ! इंडिया आघाडी बाजी मारणार !! adjustजिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा
Screenshot_20240226_195247~2
schedule23 Apr 24 person by visibility 1121 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
करवीर तालुक्यातील नेर्ली गावचे लोकनियुक्त सरपंच प्रकाश उर्फ अंकुश कृष्णात पुजारी यांनी सतेज पाटील गटाला सोडचिट्ठी देत कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. सतेज पाटील यांच्या सुडाच्या राजकारणाला कंटाळून हा निर्णय घेतल्याचे पुजारी यांनी सांगितले. 
 माजी आमदार अमल महाडिक यांच्या विचारांनी प्रभावित होवून भाजपमध्ये प्रवेश केल्याचं पुजारी म्हणाले. 
लोकसभा निवडणुकीत मंडलिक यांना गावातून मताधिक्य देण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून प्रचारफेरी काढली .सकाळी ९ वाजता वळीवडे गावातून सुरु झालेल्या या प्रचारफेरीला मतदारांचा उदंड प्रतिसाद लाभला . वसगडे, सांगवडे, सांगवडेवाडी हलसवडे या गावांना भेटी देत मंडलिक आणि महाडिक यांचे दुपारच्या सुमारास नेर्ली गावामध्ये आगमन झाले . यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. 
  खासदार संजय मंडलिक यांनी बोलताना आमदार सतेज पाटील यांचा खरा चेहरा आता उघड होत असून लोक त्यांना सोडून चालले आहेत अशी टीका केली. गावामध्ये विकासगंगा आणण्यासाठी महायुतीला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केली. 
माजी आमदार अमल महाडिक यांनी मंडलिक यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करावे असे आवाहन केले. यावेळी तानाजी पाटील, अनिल पंढरे, जितेंद्र संकपाळ,सदाशिव चौगुले, कृष्णात सुतार , भाऊसो पाटील ,मकरंद चौगुले, विक्रम पाटील, पोमान्ना पुजारी,विष्णू पुजारी,प्रकाश मगदूम, प्रदीप चौगुले, धनाजी नलवडे, अनिल मांडरेकर, योगेश मांडरेकर , अनिल पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.