ठाकरे गटाच्या निष्ठा दहीहंडीचा शिवनेरी पथक विजेता
schedule08 Sep 23 person by visibility 193 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवसेना ठाकरे गटातर्फे मिरजकर तिकटी येथे ‘निष्ठा दहीहंडी’चे आयोजन केले होते. तासगाव येथील शिवनेरी गोविंदा पथकाने ही दहीहंडी फोडली. या पथकाला एक लाख ११ हजार रुपयांचे बक्षीस दिले. सलग दुसऱ्यावर्षी शिवनेरी पथकाने ही दहीहंडी फोडली. कसबा बावडा येथील वीरमाता आनंदी उलपे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, अवधूत साळोखे, हर्षल सुर्वे, शशी बिडकर, दत्ता टिपुगडे, प्रतिज्ञा उत्तुरे, शुभांगी पोवार, विशाल देवकुळे, मंजित माने, अविनाश गायकवाड, अभिजित बुकशेठ आदी उपस्थित होते.