शिवाजी तरुण मंडळास पुढे चाल
schedule27 May 23 person by visibility 200 categoryक्रीडा
अटल चषक फुटबॉल स्पर्धा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : येथील शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या अटल चषक फुटबॉल स्पर्धेत पोलिस बंदोबस्तामुळे सामना खेळू शकत नाही अशी विनंती कोल्हापूर पोलीस फुटबॉल संघांने संयोजकांनी केल्यानंतर शिवाजी तरुण मंडळ पुढे चाल देण्यात आली.
आज शनिवारी शिवाजी तरुण मंडळ आणि कोल्हापूर पोलीस संघांमू दुपारी चार वाजता सामना होणार होता. पण पोलीस संघाने बंदोबस्त असल्याने सामना खेळू शकत नाही अशी विनंती केली स्पर्धेचे संयोजक तटाकडील तालीम मंडळ त्यांची मागणी मान्य केली.त्यानंतर संयोजकांनी शिवाजी तरुण मंडळाला पुढे चाल दिली.
रविवारचा सामना दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ दुपारी चार वाजता.