+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust.लोहिया हायस्कूलची राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत धडक adjust कुलगुरू डॉ.के.प्रथापन यांचा अवॉर्ड ऑफ ऑनरने गौरव adjustराजाराम कारखान्याच्या वार्षिक सभेत सर्व प्रश्नांची उत्तरे देणार - अमल महाडिक adjustकोल्हापुरात निघणार २५ हजार शिक्षक-कर्मचाऱ्यांचा मोर्चा! आंदोलनात पालकांचाह सहभाग !! adjust पर्यटन व्हिलेज स्पर्धेत पाटगावला राष्ट्रीय स्तरावर कांस्यपदक adjustचांदेकरवाडीच्या कुस्ती मैदानात सुभाष निऊंगरेचा प्रेक्षणीय विजय adjustशेतकरी संघ बचावासाठी धडक मोर्चा ! पालकमंत्री- जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध !! adjust चेतन नरकेंची मलेशियातील ग्लोबल सीएफओ समिटमध्ये निवड adjustसासूबाई जोरातमध्ये उलगडणार सासू-जावयाची धमाल गोष्ट adjustवीरशैव बँकेला चार कोटी ७१ लाखाचा नफा, सभासदांना दहा टक्के लाभांश
Screenshot_20230905_091804~2
Screenshot_20230903_122011~2
schedule30 May 23 person by visibility 96 categoryक्रीडा
कोल्हापूर
येथील शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर सुरू असलेल्या अटल चषक फुटबॉल स्पर्धेत शिवाजी तरुण मंडळाने फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळावर २-१ असा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. तटाकडील तालीम मंडळ आयोजित ही स्पर्धा माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केली आहे.
शिवाजी आणि फुलेवाडी यांच्यातील सामन्यात पूर्वार्धात दोन्ही संघांनी आघाडीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले. २४ व्या मिनिटाला शिवाजीच्या खेळाडूला डी मध्ये फुलेवाडीच्या खेळाडूने धोकादायक रोखल्याने मुख्य पंचांनी पेनल्टी किक बहाल केली. या संधीचा फायदा घेत विशाल पाटील यांनी अचूक पेनल्टी मारत शिवाजी तरुण मंडळाला १-०अशी आघाडी मिळवून दिली. तिसाव्या मिनिटाला शिवाजीने फुलेवाडीला दुसरा धक्का दिला. त्यांच्या योगेश कदम याने फुलेवाडीचा बचाव भेदत गोल केला. मध्यंतरापर्यंत शिवाजी तरुण मंडळ २-० असा आघाडीवर होता 
उत्तरार्धात गोलची परतफेड करण्यासाठी फुलेवाडीने सूत्रबद्ध चढाया केल्या पण शिवाजीच्या बचाव फळीने भक्कम बचाव केला. सामन्याच्या ८० व्या मिनिटाला शिवाजीच्या खेळाडूने चेंडू हाताळल्याने मुख्य पंचानी पेनाल्टी किक बहाल केली.यावर रोहित मंडलिकने अचूक पेनल्टी कीक मारत एक गोलने आघाडी कमी केली. पूर्ण वेळेत एक गोलची आघाडी कायम टिकवत शिवाजी संघांने २-१ असा फरकाने सामना जिंकला. शिवाजी संघांच्या योगेश कदम याची सामनावीर म्हणून तर फुलेवाडीच्या अक्षय शिंदे याची लढवय्या खेळाडू म्हणून निवड झाली.
बुधवारचा सामना
संयुक्त जुना बुधवार पेठ विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ ब, दुपारी चार वाजता.