शिवसेना ठाकरे गटातर्फे शुक्रवारी महापालिकेवर धडक आंदोलन
schedule28 Mar 23 person by visibility 715 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील विविध भागात गेले काही दिवस अपुरा पाणीपुरवठा होत आहे. अपुरा पाणीपुरवठामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या प्रश्नी महापालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी महापालिकेवर शुक्रवारी (३१ मार्च) धडक आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती शहरप्रमुख रवीकिरण इंगवले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
शुक्रवारी दुपारी बारा वाजता पानासाठी आंदोलन होणार आहे या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख सुनील मोदी, हर्षल सुर्वे म्हणजेच माने दिगंबर परमार संतोष कांदेकर विशाल देवकुळे, राजू जाधव, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक शुभांगी पवार, प्रज्ञा उत्तुरे, बहुजन परिवर्तन पार्टीचे बाजीराव नाईक आदी सहभागी होणार आहेत. या आंदोलनात नागरिक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.