+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे. adjustमोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास राहिला नाही ! इंडिया आघाडी बाजी मारणार !! adjustजिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा
Screenshot_20240226_195247~2
schedule22 Apr 24 person by visibility 35 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : 
कोल्हापूर लोकसभेच्या २०१९ च्या निवडणूकीत शाहू छत्रपतींचा आशिर्वाद घेण्यासाठी वाड्यावर गेलेले चालते पण २०२४ च्या निवडणूकीत त्यांची उमेदवारी चालत नाही. हा दुट्टपीपणा बंद झाला पाहिजे असे सांगतानाच मागील निवडणुकीत अजिंक्यताराच्या किती पायऱ्या आपण भिजवल्या झिजवल्या असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी खासदार संजय मंडलिक यांना केला. तिकिटासाठी वणवण फिरावे लागले यातूनच जनेतेच्या मनातून मंडलिकांची विश्वासार्हता संपली आहे, अशी  टीकाही त्यांनी केली. 
 मिरजकर तिकटी येथील इंडिया आघाडी, महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचार सभेत आमदार सतेज पाटील बोलत होते. यावेळी काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती, आमदार जयश्री जाधव, मालोजीराजे छत्रपती, शिवसेना उप नेते जिल्हा प्रमुख संजय पवार, सह संपर्क नेते विजय देवणे, वंचितचे जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. शाहू छत्रपतींना प्रचंड मताधिक्यांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी महाविकास आघाडीतील नेत्यांनी केले. 
श्रीमंत शाहू छत्रपती म्हणाले, देशात काँग्रेसने विकासाचा पाया घातला. देश स्वातंत्र्य झाल्यावर भाक्रा नानगल, कोयना, कोल्हापूर जिल्ह्यात वारणा, काळम्मावाडी ही मोठी धरणे बांधली. दहा वर्षात एकही नवीन धरण, आणि विजेसाठी अणुभट्टी बांधलेले नाही. कोल्हापूरात हायकोर्टाचे सर्कीट बेंचची उभारणी, पंचगंगा प्रदूषण मुक्ती, युवकांना नोकरीसाठी आयटी पार्क, पर्यटनाला चालना, विमानतळ आणि रेल्वे यंत्रणात सुधारणा, खेळासाठी नवीन क्रीडांगणे या विषयांना प्राधान्य देणार असल्याचे आश्वासन दिले.
 शिवसेना उपनेते संजय पवार यांनी खासदार मंडलिक हे बेंटेक्स आहेत आणि शाहू महाराज अस्सल सोने आहेत असे म्हणाले, यावेळी माजी नगरसेविका भारती पोवार, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी दिला. यावेळी आमदार जयश्री जाधव, वंचितचे जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष आर.के. पोवार, शिवसेना शहर प्रमुख सुनील मोदी, शिवसेना युवा नेते हर्षल सुर्वे, माजी नगरसेवक राजू लाटकर, प्राचार्य टी.एस. पाटील, कॉ. सतीशचंद्र कांबळे राजेंद्र ठोंबरे, अशोक पोवार, यांची भाषणे झाली.
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण,संभाजीराव जगदाळे, शिवाजीराव परुळेकर,  वसंत पाटील, निरंजन कदम, वासिम फरास, विनायक साळोखे, हिंदकेसरी विनोद चौगुले, अनिल घाटगे, महाराष्ट्रकेसरी विष्णू जोशीलकर, जयकुमार शिंदे, महिला काँग्रेसच्या सरला पाटील, दिनेश साळोखे, नितिन शेळके उपस्थित होते.  
..........................
टायटल साँगचे अनावरण
शाहू छत्रपतींच्या प्रचारार्थ मंगळवार पेठेतील १२ तालमींच्या अध्यक्षांच्या हस्ते शाहू छत्रपतींच्या प्रचारार्थ तयार केलेल्या छत्रपती या टायटल साँगचे अनावरण झाले. आमदार सतेज पाटील यांच्या कल्पनेतून हे टायटल साँग तयार करण्यात आले आहे.