महाराष्ट्र न्यूज वन कोल्हापूर: हैदराबाद येथे झालेल्या अखिल भारतीय नॅशनल सिरीज लाॅन टेनिस स्पर्धेत मुलांचा 16 वर्षाखालील गटात दुहेरीत के.डी.एल.टि.ए चा सार्थक गायकवाडने विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत सार्थक गायकवाड (महाराष्ट्र) आणि करण थापा(केरळ) या जोडीने यांनी वरद पोळ (महाराष्ट्र)आणि ,प्रजण्य अधुरी यांचा 6/2, 6/4.असा पराभव केला. सार्थक हा चाटे स्कूलचा विद्यार्थी असून तो इयत्ता १० वी मध्ये शिकत आहे. त्याला प्रशिक्षक मनाल देसाई व अर्षद देसाई तसेच केडीएलटिए यांचे मार्गदर्शन लाभले.