संजय भोसलेंचा दोषमुक्तीचा अर्ज कोर्टाकडून नामंजूर, आयुक्तांनी निलंबित करावे – भूपाल शेटे
schedule17 Jun 26 person by visibility 10 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महापालिकेचे वर्कशॉप इनचार्ज संजय भोसले यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती पंकज बी. रजपूत यांच्याकडे घरफाळा घोटाळा गुन्ह्यातून दोषमुक्त करण्यासाठी दाखल केलेला अर्ज कोर्टाने नामंजूर केला आहे. यामुळे आयुक्त् राजेंद्र भारुड यांनी भोसले यांना निलंबित करावे अशी मागणी माजी नगरसेवक भूपाल शेटे यांनी केली.महापालिकेतील घरफाळा घोटाळयात एकूण बारा आरोपी आहेत. त्यापैकी सात आरोपीवर अद्याप गुन्हा दाखल नाही असेही शेटे यांनी सांगितले. महापालिका घरफाळा घोटाळयात भोसले यांनी, स्वताच्या फायद्याकरिता अधिकारामध्ये सवलत देऊ रेकॉर्डला व संगणक सिस्टीमला चुकीच्या नोंदी घेऊन महापालिकेची एकूण एक कोटी ८७ लाख ७३१ रुपयांची आर्थिक नुकसान केले असल्याचे शेटे यांनी म्हटले आहे. या प्रकरणी भोसले यांनी कोर्टात दोषमुक्तीसंबंधी याचिका दाखल केली होती. त्यामध्ये भोसले यांनी, ‘घरफाळा प्रकरणी कागदपत्रावर निश्चित केलेली आकारणी ही अनियमितता आहे. चुकीच्या पद्धतीने केलेली कर आकारणी व अनियमितता कायद्याने गुन्हा होत नाही, यामुळे दोषमुक्त करावे’ असे म्हटले होते.