Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जयंत आसगावकरांनी घेतली शरद पवारांची भेट अगोदर तुमच्यातील वाद मिटवा, मग आमच्याकडे बघा ! जिल्हा बँकेच्या सभेत मुश्रीफ व सतेज पाटलांचे राजकीय चिमटेदुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीत गडहिंग्लज तालुक्याचा प्राधान्याने समावेश करावा - संग्रामसिंह कुपेकरजिल्हा बँकेत पुढे काय होणार आहे आता सांगू शकत नाही... सभेत हसन मुश्रीफांचे सूतोवाचज्ञानेश कुमार, भाजपच्या विरोधात काँग्रेसची कोल्हापुरात जोरदार निदर्शनेन्यायालये ही सर्वसामान्यांचा आशावाद, वकिलांनी व्यावसायिक नीतीमूल्ये सांभाळावीत - असीम सरोदेमहायुतीत संशयकल्लोळ, ठरावधारकांचे व्हेरिफिकेशन ! मंत्र्यांच्यासमोर हायहोल्टेज ड्रामा अन् डॅमेज कंट्रोलसाठी नेत्यांची धाव !!शिक्षक बँकेची सभा गोंधळाची, सत्ताधारी- विरोधकात हमरीतुमरी ! संचालकांची संख्या १७ वरुन २१ करण्याचा ठराव मंजूर !!गडहिंग्लजमध्ये मुख्याध्यापक संघाची नव्याने इमारत उभारणार, मुख्याध्यापक संघाच्या सर्वसाधारण सभेत निर्णयठरावधारकांच्या व्हेरिफिकेशनवरून भाजप- राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्यामध्ये जोरदार वादावादी, मंत्र्यांची धावाधाव

जाहिरात

 

अगोदर तुमच्यातील वाद मिटवा, मग आमच्याकडे बघा ! जिल्हा बँकेच्या सभेत मुश्रीफ व सतेज पाटलांचे राजकीय चिमटे

schedule28 Sep 26 person by visibility 14 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  :  कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ८८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वैद्यकीय शिक्षणमंत्री व बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी एकमेकांचे चिमटे काढले. गोकुळ निवडणुकीची धामधूम सुरू असताना बँकेच्या सभेच्या निमित्ताने जिल्ह्यातील नेतेमंडळी एकाच व्यासपीठावर होती. यामुळे सभेला उपस्थित सभासदांचे लक्ष व्यासपीठावरील नेतेमंडळी व त्यांच्या भाषणाकडे होते. अध्यक्षीय भाषणात मंत्री मुश्रीफ यांनी बँकेचे कामकाज, विविध योजना, भविष्यकालीन धोरण यासाऱ्या बाबींचा ऊहापोह केला. भाषणाच्या समारोपाकडे वळताना त्यांनी आमदार पाटील यांच्याकडे पाहत, ‘गोकुळच्या निवडणुकीच्या प्रचारातूनही वेळात वेळ काढून आमदार पाटील से वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहिले. त्यांचे मी आभार मानतो.’अशा शब्दांत चिमटा काढला. मुश्रीफ यांच्या विधानावर व्यासपीठावरील सगळया नेतेमंडळीसह आमदार सतेज पाटील यांनाही हसू आवरता आले नाही. उपस्थित सभासदांनीही हसत हसत मुश्रीफ यांच्या विधानाला दाद दिली. मुश्रीफ यांच्या विधानावर आमदार पाटील काय बोलणार याविषयी उपस्थितांत उत्सुकता वाढली. साऱ्यांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या. आमदार पाटील यांनी मुश्रीफ यांच्याकडे पाहत, ‘अगोदर तुमच्यातील (महायुती) वाद मिटवा, मग आमच्याकडे बघा’अशा मोजक्या शब्दांत टोला लगावला. आमदार पाटील यांच्या या विधानाने सभेत पुन्हा एकदा हास्य पिकले. गोकुळच्या निवडणुकीवरुन गेले काही दिवस विविध चर्चा होत आहेत. निवडणूक होणार की बिनविरोध होणार, बिनविरोध झाली तर कोणाला किती जागा, प्रत्येक पक्षाचे उमेदवार किती अशा चर्चा रंगत आहेत. दुसरीकडे जागा वाटपावरुन महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. रविवारी, महायुतीमधील नेत्यांमधील झालेला वाद, पदाधिकाऱ्यांतील संघर्ष या घटना ताजा आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes