Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गडहिंग्लजमध्ये मुख्याध्यापक संघाची नव्याने इमारत उभारणार, मुख्याध्यापक संघाच्या सर्वसाधारण सभेत निर्णयठरावधारकांच्या व्हेरिफिकेशनवरून भाजप- राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्यामध्ये जोरदार वादावादी, मंत्र्यांची धावाधावमहायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटेना, नेते मंडळांची पुन्हा बैठक सुरूशिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा कोल्हापुरात उत्साहात शुभारंभशिक्षक बँकेला तीन कोटीहून अधिक नफा, आठ टक्के लाभांश ! व्यवसाय वृद्धीसाठी संचालक संख्या वाढीचा प्रस्ताव ! !सत्ताधारी संचालकांनी सभासदांची दिशाभूल थांबवावी, गेल्या चार वर्षाची कामगिरी मांडावी ! दोन अंकी लाभांश, एक अंकी व्याजदर केव्हा देणार ते सांगा !!डॉ.डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये गौराई खेळ' स्पर्धा उत्साहातशिवराजे स्पोर्ट्सतर्फे गरीब-होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटपशिक्षकांच्या प्रश्नांना विधीमंडळात आवाज देण्यासाठी माझी उमेदवारी- प्रा. सचिन सानपलोकसंवाद-२०२६ उपक्रमांतर्गत आष्टा, कसबे डिग्रजमध्ये प्रबोधन

जाहिरात

 

ठरावधारकांच्या व्हेरिफिकेशनवरून भाजप- राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्यामध्ये जोरदार वादावादी, मंत्र्यांची धावाधाव

schedule27 Sep 26 person by visibility 242 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : गोकुळ निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात रविवारी प्रत्येक तालुक्यातील ठरावधारकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित केलेल्या या बैठकीत तालुकानिहाय आढावा घेण्यात आला. दरम्यान गडहिंग्लज तालुक्यातील ठरावधारकांची माहिती घेत असताना भाजप कार्यालयात राष्ट्रवादीचे पदाधिकारी सतीश पाटील व विकास पाटील कुरुकुलीकर हे दोघे त्या ठिकाणी पोचले. आणि त्यांनी भाजपच्या ठरावधारकांच व्हेरिफिकेशन करण्याची मागणी केली. त्यावर गडहिंग्लजमधील पदाधिकाऱ्यांनी त्याला जोरदार आक्षेप घेतला. या विषयांमध्ये गोकुळच्या माजी संचालिका शौमिका महाडिक यांनीही भाग घेत भाजपच्या व्हेरिफिकेशनला आक्षेप घेण्याचा इतरांचा काय संबंध ? अशी विचारणा केल्याचे वृत्त आहे. तर कोरी यांच्या समर्थकांनी भाजपच्या ठराधारकांची व्हेरिफिकेशन करण्याचा राष्ट्रवादीला काय अधिकार ?असा सवाल यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्याकडे  केला. त्यामुळे वातावरण चांगले तापले. मंत्री पाटील यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही या प्रकाराबाबत फोनवरून मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडेही नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे. तसेच बैठकीला उपस्थित राष्ट्रवादीचे माजी आमदार के पी पाटील व जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुरलेकर यांच्याकडे पाहून हे काही बरोबर घडले नाही अशा शब्दात त्यांनी साऱ्या घटनेवर तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्याचे वृत्त आहे मंत्री पाटील यांचा फोन झाल्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ हे तत्काळ  भाजप कार्यालयात दाखल झाले.
गोकुळ निवडणुकीसाठी सदा उमेदवारी निश्चितीची धामधूम सुरू आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना , जनसुराज्य शक्ती पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवत आहेत. महायुती म्हणून सगळ्या जागा लढवण्याचा त्यांनी निर्णय घोषित केला आहे. जागा वाटप करण्यासाठी प्रत्येक आपापल्या ठराव धारकांची माहिती संकलित करत आहे कोणाकडे किती ठराव आहेत याची चाचणी सुरू आहे भारतीय जनता पक्षाच्या वतीने नागाळा पार्क येथील कार्यालयात रविवारी भाजपच्या वतीने ठरावधारकांची बैठक आयोजित केली होती. तालुकानिहाय माहिती घेतली जात होती. या बैठकीला मंत्री पाटील, खासदार महाडिक, आमदार महाडिक, गोकुळच्या माजी संचालिका शौमिका महाडिक, चेतन नरके, धैर्यशील देसाई, दीपक पाटील, प्रताप पाटील त्यांच्यासह भाजपकडून गोकुळसाठी इच्छुक असलेले सगळे उमेदवार व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. गडहिंग्लज तालुक्यातील ठरावधारकांची माहिती घेत असताना त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी बैठकीच्या ठिकाणी आले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, विकास पाटील कुरुकलीकर यांच्यासह आणखी काही कार्यकर्ते बैठकीच्या ठिकाणी दाखल झाले त्यांनी गडहिंग्लज मधील ठराव धारकावरून भाजपकडे शहानिशा करण्याची मागणी केली. तसेच क्रॉस चेक करण्याचा सांगितले त्याला गडहिंग्लज मधील भारतीय जनता पक्षाच्या नेत्या स्वाती कोरे यांच्या समर्थकाने जोरदार आक्षेप घेतला. भाजपच्या ठरावधारकांची शहानिशा करण्याचा तुमचा काय संबंध? असा सवाल केला. तुमच्या ठरावाधकांच्या  शहानिशा केली आहे का ? मग भाजपच्या ठराधारकांची शहानिशा करण्याचे  करण्याची कारणच काय ? असा सवाल केला. यामुळे बैठकीतील वातावरण चांगलेच गरम झाले मंत्री पाटील यांनी माजी आमदार के पी पाटील यांच्याकडे पाहत हे बरोबर घडलेले नाही अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर बैठक आटोपती घेण्यात आली व नेते मंडळांची स्वतंत्र बैठक झाली. थोड्यावेळाने मंत्री मुश्रीफ हे देखील भाजप कार्यालयातून बैठकीत सामील झाले. या बैठकीला भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय बलगुडे ,रविंद्र माने हे देखील उपस्थित होते

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes