+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustवस्ताद बाबूराव चव्हाण यांचे निधन adjustकागल-पेठनाका राष्ट्रीय महामार्गावरील नवीन कामांना शंभर कोटी-धैर्यशील माने adjustचंद्रकांत पाटलांची कोल्हापूरसाठी मोठी घोषणा, पुढील शैक्षणिक वर्षापासून फार्मसी कॉलेज !! adjustजागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांत शिवाजी विद्यापीठाचे चौदा संशोधक adjustमुस्लिम समाजातर्फे शहरातून शांतता फेरी adjustस्वच्छता ही सेवा अभियान ! सीईओसह अधिकारी सहभागी !! adjustएनआयटी कोल्हापूरमध्ये कौशल्यपूर्ण अभियंते घडतील - चंद्रकांत पाटील adjustऋतुराज पाटील यांच्याकडून क्षयरुग्णांना पोषण आहार किट adjustआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीचे प्रस्ताव पात्र adjustराष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक सागर बगाडे, विवेक चंदालियांचा शनिवारी नागरी सत्कार
1000926502
1000854315
schedule04 Aug 24 person by visibility 429 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने आयोजित राजेश यूथ फेस्टिव्हल तरुणाईच्या जल्लोषात पार पडला. युवा सेना, नो मर्सी ग्रुपतर्फे या फेस्टिव्हलचे आयोजन केले होते. तरुणाईच्या ओसांडून वाहणाऱ्या उत्साहात हा फेस्टिव्हल रंगला.या सांकृतिक कार्यक्रमामध्ये रॉक बँड ग्रुपच्या कलाकारांनी केलेल्या विविध हिंदी मराठी गाण्यांच्या डान्सवर युवा वर्गाने जल्लोष केला. तर डीजे विकी, अँकर ऐश्वर्या यांच्या एकापेक्षा एक सर्सास सॉंग ट्रॅकनी उपस्थित युवा वर्गास थिरकायला लावले. 
 राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी युवा वर्गाला व्यसनमुक्तीची शपथ दिली. युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर आणि युवा नेते पुष्कराज क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली फ्रेन्डशिप डे निमित्त मैत्री युवा महोत्सवाचे आयोजन केले होते. 
याप्रसंगी राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘ तरुणांचा देश म्हणून ओळख असणाऱ्या भारत देशाला जागतिक महासत्ता बनविण्यात तरुण वर्गाला महत्वाची भूमिका बजावावी लागणार आहे. त्यामुळे निर्व्यसनी आणि भ्रष्टाचार मुक्त भारताची बीजे युवा पिढीतून रोवली जाणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत @२०४७ याद्वारे सन २०४७ पर्यंत देशाला जागतिक महासत्ता बनविण्याचा संकल्प केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार राज्याच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. मित्रा संस्थेच्या माध्यमातून युवा पिढीच्या सक्षमीकरणाकडे भर देण्यात येत आहे. ’
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, महेंद्र घाटगे, माजी नगरसेवक राहुल चव्हाण, दिशा ऋतुराज क्षीरसागर, महिला आघाडी शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, युवा सेनेचे चेतन शिंदे, पियुष चव्हाण, विश्वदीप साळोखे, मंदार पाटील नो मर्सि ग्रुपचे अजिंक्य पाटील, अक्षय पाटील, दिग्विजय साळोखे, धनराज कणसे, रोहित मेळवंकी, करण मिरजकर, ओंकार वाले, राज अहमद सय्यद, धवल भोसले, ओंकार यादव, समरजित मोहिते, विपुल भंडारे, अभिषेक बागल, आदी उपस्थित होते.
......................
विविध स्पर्धांचा निकाल
राजेश युथ फेस्टिवलं अंतर्गत पार पडलेल्या विविध स्पर्धेअंतर्गत कलाकृती स्पर्धेत प्रथम क्रमांक कौशीक आडसूळ, द्वितीय क्रमांक कौशीक पटेल, तृतीय क्रमांक सोनाली पोवार, उत्तेजनार्थ क्रमांक रोहित गायकवाड, रोहित सुतार यांनी मिळविले. सौदर्य स्पर्धेत प्रथम क्रमांक सेजल पाटील, द्वितीय क्रमांक नाज मुल्ला, तृतीय क्रमांक निकिता मुरगूनडे, बेस्ट वॉक प्रणोती कुंभार, बेस्ट स्माईल मानसी सुतार, बेस्ट पर्सनॅलिटी गौसिया हबीब, ओव्हर ऑल कॉन्फिडन्स योगिता हावलदार यांनी मिळविले.  फुटबॉल टर्फ स्पर्धा, आर्ट स्पर्धा, फॅशन शो आदी स्पर्धांचे बक्षीस वितरण राजेश क्षीरसागर , देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ऋतुराज क्षीरसागर आणि पुष्कराज क्षीरसागर यांनी मनोगते व्यक्त केली.