महापालिकेतर्फे राजर्षी शाहू केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा ! पाच लाखाहून अधिक रुपयंची बक्षीसे !!
schedule25 May 23 person by visibility 359 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्यावतीने दोन ते चार जून २०२३ या कालावधीत पुरुष व महिला पैलवानांच्या राजर्षी शाहू केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजित केली आहे. महापालिकेच्या उपायुक्त रविकांत आडसूळ यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. कुस्तीपटूंना एकूण पाच लाख ७१ हजार रुपयांची बक्षीसे आहेत.
कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने राजर्षी शाहू स्मृती शताब्दी वर्षानिमित्त या स्पर्धेचे आयोजन आहे. राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदान येथे स्पर्धा होणार आहे. पुरुष गटामध्ये ५७ किलो, ६१ किलो, ६५ किलो, ७० किलो, ७४ किलो व ८६ किलो वजन व ८६ किलोवर खुला गट अशा आठ गटात स्पर्धा होतील.
महिला गटामध्ये ५५ किलो, ६० किलो व ६० किलोवर अशा तीन वजन गटामध्ये स्पर्धा आहेत. पुरूष गटामध्ये व महिला गटामध्ये साठ किलो गटावर राजर्षी शाहू केसरी कुस्ती स्पर्धा होईल. स्पर्धेच्या अंतिम दिवशी चार जून रोजी खुल्या गटात मैदानी आकर्षक व काटा जोड कुस्ती पै. माऊली कोकाटे व पै.शैलेश शेळके यांच्यामध्ये कुस्ती होणार आहे.
पत्रकार परिषदेला महापालिकेचे इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, तालीम संघाचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, सरचिटणीस महादेवराव आडगुळे, सचिव अशोक पोवार, हिंदकेसरी विनोद चौगले, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशिलकर, नामदेव मोळे, माजी महापौर आर. के. पोवार, अंजली जाधव आदी उपस्थित होते.