जिप कर्मचाऱ्यांना राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार जाहीर
schedule24 Jun 24 person by visibility 254 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू पुरस्काराची घोषणा झाली. राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. गौरवचिनह व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांमध्ये प्रशांत डोईफोडे (कक्ष अधिकारी, पंचायत समिती शिरोळ), भीमराव टोणपे ( विस्तार अधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद),प्रतिभा गुरव (वरिष्ठ सहायक ग्रामपंचायत विभाग कोल्हापूर), प्रशातं डवंग (कनिष्ठ सहायक पंचायत समिती भुदरगड), रमेश सुतार (वाहनचालक पंचायत समिती राधानगरी), शिवदास भणगे (परिचर माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद), सचिन मोरे (आरोग्य सेवक प्राथमिक आरोग्य केंद्र आळते), सविता पालकर (आरोग्य सेवक प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोली दुमाला), शामलाल चौरे (आरोग्य सहायक प्राथमिक आरोग्य केंद्र जयसिंगपूर), मंगल चौरे (आरोग्य सहायक प्राथमिक आरोग्य केंद्र सरुड), प्रणाली पाटील (औषध निर्माता प्राथमिक आरोग्य केंद्र बोरपाडळे), नामदेव कुट्रे (पशुधन पर्यवेक्षक ढोलगरवाडी), शुभांगी कार्वेकर (विस्तार अधिकारी, कृषी पंचायत समिती कागल), अशोक तोडकर (कनिष्ठ अभियंता, बांधकाम विभाग पंचायत समिती गडहिंग्लज) यांचा समावेश आहे.