Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
विद्यापीठाची स्थापना, बाळासाहेब देसाईंचा खमकेपणा, सरकारची कमिटी अन् नावावर शिक्कामोर्तब !महानगर जिल्हाध्यक्षपदासाठी भाजपमध्ये हालचालीप्रा . उदय आनंदराव पाटील यांना पीएचडी जाहीरयड्रावमधील बुद्धिबळ स्पर्धेत विवान सोनी अजिंक्य,अभय भोसले उपविजेता आनंदी जीवनासाठी वाईटाचा त्याग अन् चांगल्याचा स्वीकार करा : इंद्रजित देशमुखकोल्हापुरात रविवारी होमिओपॅथी परिषदशिवाजी विद्यापीठ हेच नाव कायम राहावे, शिवप्रेमींची शुक्रवारी बैठकपीएम विद्यालक्ष्मी योजनेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा : शिक्षण सहसंचालक धनराज नाकाडेशेतकऱ्यांची मुंबईत धडक !  आझाद मैदान गरजला एकच जिद्द-शक्तीपीठ रद्द !!महाडिकांची कार्यपद्धती, सामान्य माणसाला पद ! चालक बनला संचालक, शेतकऱ्यांचाही सन्मान!!

जाहिरात

 

रेसिडेन्सी क्लबच्या निवडणुकीत प्रोग्रेसिव्ह ग्रुप विजयी

schedule03 Feb 25 person by visibility 160 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  आमदार, खासदार, वरिष्ठ सरकारी अधिकारी, बांधकाम व्यावसायिक, कारखानदार-उद्योजक, डॉक्टर मंडळी सभासद असलेल्या येथील रेसिडन्सी क्लबच्या निवडणुकीत प्रोग्रेसिव्ह ग्रुप पॅनेलने एकतर्फी विजय मिळवला. पंधरापैकी पंधरा जागा जिंकत प्रोग्रेसिव्ह ग्रुपने पुन्हा एकदा रेसिडेन्सी क्लबच्या निवडणुकीत वर्चस्व दाखविले.

पंधरा जागेसाठी सोळा उमेदवार रिंगणात होते. यामुळे रेसिडेन्सी क्लबची निवडणूक झाली. एकूण सभासद संख्या  १९५१ इतकी आहे. यापैकी १२४४ सभासदांनी मतदान केले. एकूण ६३.७६ टक्के मतदान झाले.  उद्योजक सतीश घाटगे, अमर गांधी, ऋतुराज इंगळे, अभिजीत मगदूम यांच्या नेतृत्वाखाली प्रोग्रेसिव्ह ग्रुप पॅनेल होते. रविवारी (दोन फेब्रुवारी २०२५) रोजी मतदान झाले. निवडणूक आणि मतदानामुळे रेसिडेन्सी क्लब येथे दिवसभर गर्दी होती.  सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदानाची प्रक्रिया पार पडली. सायंकाळी सहानंतर मतमोजणीला सुरुवात झाली. रात्री आठ वाजण्यास सुमारास निकाल जाहीर झाला. यामध्ये प्रोग्रेसिव्ह ग्रुपचे सर्व उमेदवार विजयी झाले. तर  अपक्ष पराभूत उमेदवार नित्यानंद प्रभू यांना ४४५ मते मिळाली.

दरम्यान रेसिडेन्सी क्लबच्या निवडणुकीसाठी खासदार धैर्यशील माने, आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, अमल महाडिक यांनीही मतदान केले. जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनीही मतदान केले.  उपजिल्हाधिकारी शक्ती कदम यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. नायब तहसिलदार शंकर गुरव, सुनील घाग, अनिल शिंदे, आशिष शिंदे यांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.  

  प्रोग्रेसिव्ह ग्रुपचे विजयी उमेदवार व त्यांना प्राप्त मते : सचिन घाटगे  -११३९ मते, अभिजीत मगदूम  - ११३०, शीतल भोसले  - ११२२, तुषार घाटगे – ११२२,  सचिन झंवर – ११०३, विक्रांत कदम – ११०२, नील पंडित बावडेकर  - ११०२, समीर कुलकर्णी – १०९९, रवी संघवी – १०८७, नरेश चंदवाणी – १०७६, डॉ. पृथ्वीराज जाधव – १०७१, नयन सामाणी – १०५६, शंकर दुल्हाणी – १०४५, साईदास खाणगाव – १००५ मते.

………………………..

“ रेसिडेन्सी क्लबच्या निवडणुकीत प्रोग्रेसिव्ह ग्रुपने नवीन व जुन्या चेहऱ्यांना संधी दिली होती. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आमचा पहिल्यापासून प्रयत्न होता. मात्र जागा पंधरा आणि उमेदवार सोळा अशी स्थिती झाल्यामुळे निवडणूक झाली. सभासद-मतदारांनी पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास व्यक्त केला. प्रोग्रेसिव्ह ग्रुपच्या सगळया उमेदवारांना विजयी केले.”

  • सतीश घाटगे, पॅनेलप्रमुख प्रोग्रेसिव्ह ग्रुप

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes